Friday, April 19, 2024

‘मी पोस्ट डिलीट करणार नाही’, म्हणत केतकी चितळेने न्यायालयात स्वतः मांडली बाजू

सध्या महाराष्ट्रात केतकी चितळे (Ketaki Chitale) प्रकरण चांगलेच गाजताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री केतकी चितळने आपल्या फेसबूक अकाउंटवरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्यानंतर राज्यभरातील राष्ट्रवादीच्या समर्थकांनी आणि नेत्यांनी तिच्यावर जोरदार टिका केली होती. या विरोधात तिच्यावर अनेक ठिकाणी पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात आले होते. याचवेळी तिला ठाणे सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर आता तिला तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Ketaki Chitale & Sharad Pawar
File Photo

न्यायालयात हजर केल्यानंतर केतकी चितळेने आपली बाजू मांडण्यासाठी कोणताही वकील निवडला नाही, त्यामुळे तिच्या बाजूने स्वतःच युक्तीवाद करण्याचा निर्णय घेतला. तिची बाजू मांडताना केतकी चितळेने ही पोस्ट मी लिहलेली नव्हती. तसेच माझे मत मांडण्याचा मला अधिकार आहे असे न्यायालयापुढे स्पष्ट केले. त्याचवेळी तिने ही पोस्ट डिलीट करणार नसल्याचाही उल्लेख केला. तत्पुर्वी तिच्या या पोस्टमुळे राज्यतभरातील राज्यकीय नेत्यांनी तिच्यावर जोरदार टिका केली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही अशी विकृती वाढता कामा नये असे म्हणत केतकीला सज्जड दम भरला आहे.

दरम्यान या आक्षोपार्ह पोस्टमुळे वादात अडकलेल्या केतकीवर कळंबोली पोलिस ठाण्याबाहेर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी शाई आणि अंडी फेकल्याचाही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर केतकीला तात्काळ गाडीमध्ये बसवत सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. त्यामुळेच केतकी चितळेवर राज्यभरातील कार्यकर्ते संतापल्याचे दिसत आहे. मात्र वादात अडकण्याची अभिनेत्री केतकीची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा ती अशाप्रकारच्या वादग्रस्त पोस्ट करुन नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. २०२० मध्येही तिच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यात आता रबाळे पोलिसांकडूनही केतळीचा ताबा घेण्याची मागणी होऊ लागली आहे त्यामुळे केतकीच्या अडचणी वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा