प्रसिद्ध रॅपर आणि बिग बॉस १६ चा विजेता एमसी स्टॅन सध्या विविध कारणांमुळे सतत चर्चेत येत आहे. बिग बॉस १६ जिंकल्यानंतर स्टॅन सतत त्याच्या फॅन्समध्ये गाजत आहे. विविध पार्ट्यांमध्ये, विविध रेकॉर्ड्समध्ये सतत त्याचे नाव येत आहे. बिग बॉसमध्ये येण्याआधी मर्यादित लोकांना माहित असलेला स्टॅन आज मोठा सेलिब्रिटी बनला आहे. बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर त्याला त्याचे रॅप सॉन्ग लोकांसमोर प्रदर्शित करता आलेच नाही. यासाठी बरेच दिवस वाट पाहणारा स्टॅन आता सध्या त्याच्या विविध कॉन्सर्टमधे व्यस्त आहे. नुकताच एमसी स्टॅनचा मुंबईमध्ये एक मोठा आणि धमाकेदार कॉन्सर्ट पार पडला. यावेळी त्याच्या हजरो फॅन्ससोबतच त्याची खास ‘मंडळी’ देखील यावेळी उपस्थित होती.
एमसी स्टॅनचा ५ मार्च रोजी मुंबईमध्ये एक मोठा कॉन्सर्ट झाला. यावेळी शिव ठाकरे, निमृत कौर, सुंबुल तौकीर खान. मान्या सिंग आदी कलाकार या कॉन्सर्टला पोहचले होते. आधी निमृत आणि शिवने पापाराजीना एकत्र पोज दिल्या आणि नंतर सुंबुल तौकीर खानने देखील त्यांच्यासोबत अनेक फोटो काढले. यावेळी या तिघांनीही एमसी स्टॅनला पाठिंबा दिला.
यावेळी एमसी स्टॅनचा जिवलग मित्र असलेला शिव ठाकरेने त्याच्या इंस्टाग्रामवर कॉन्सर्टबद्दल एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यात त्याने या कॉन्सर्टचा एक फोटो पोस्ट करत लिहिले, “एमसी स्टॅन…मेरी जान मला तुझ्यावर गर्व आहे” तर दुसरीकडे निमृत कौरने देखील तिच्या इन्स्टा स्टोरीवर कॉन्सर्टचा फोटो पोस्ट करत लिहिले, “माझा भाऊ…माझा शेर…देवा आशीर्वाद दे” तर सुंबुलने देखील कॉन्सर्टचा फोटो शेअर करत लिहिले, “माझा भाऊ”.
एम सी स्टॅनने बिग बॉस १६ ची ट्रॉफीची तर नाही जिंकली सोबतच अनेक चांगले मित्र देखील कमावले आहेत. शोमध्ये त्याची चांगली मैत्री शिव ठाकरे, निमृत कौर अहलूवालिया, सुंबुल तौकीर खान, अब्दू रोजिक, साजिद खान यांच्यासोबत पाहायला मिळाली. त्यांच्या ग्रुपला मंडळी म्हटले जाऊ लागले आणि हाच शब्द खूप लोकप्रिय झाला.
एमसी स्टॅनच्या या कॉन्सर्टमध्ये शिव ठाकरेने मोठ्या प्रमाणावर लाइमलाइट मिळवले आहे. सोशल मीडियावर शिव ठाकरेचा चांगलाच बोलबाला पाहायला मिळत आहे. कॉन्सर्टमधील त्याचे काही व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पहाटे 2 वाजता प्राइवेट प्रॉपटीमध्ये पॅपराझींच्या एंट्रीवर सैफ अली खान म्हणाला, ‘कुठे आहे मर्यादा?…’
आमिर खानच्या बोलण्यावर संतापले होते मोगॅंबो, नेमके काय होते कारण? एकदा जाणून घ्याच