‘कोणत्याही पुरस्कारापेक्षा भारीच’, अभिषेकचा ‘हा’ सिनेमा पाहून १२ कैदी बोर्डाच्या परीक्षेत पास, तिघांनी केला टॉप

सिनेमा नेहमीच व्यक्तीच्या आयुष्यात तसेच समाजात बदल घडवून आणण्याचं काम करतो. असेच काहीसे प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन याच्या ‘दसवी’ या सिनेमाने करून दाखवले आहे. दसवी हा सिनेमा यावर्षी एप्रिल महिन्यात प्रदर्शित झाला होता. म्हणजेच जवळपास २ महिने उलटून गेल्यानंतरही या सिनेमाचा प्रभाव व्यक्तींच्या आयुष्यावर पडत आहे. या सिनेमाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी ऐकून अभिषेकचीही छाती गर्वाने फुगली आहे. नुकतेच असे वृत्त आले आहे की, आग्राच्या सेंट्रल जेलमधील कैदी १०वी आणि १२वीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे, या सिनेमाची शूटिंगदेखील याच तुरुंगात झाली होती.

माध्यमांतील वृत्तानुसार, आग्राच्या सेंट्रल जेलमधील १२ कैद्यांनी आता उत्तरप्रदेश बोर्डाच्या परीक्षा दिल्या आहेत. त्यातील ९ कैदी १०वीच्या परीक्षा आणि ३ कैदी १२वीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या ९ कैद्यांपैकी ३ कैद्यांना प्रथम श्रेणी, तर उर्वरित ६ कैद्यांना द्वितीय श्रेणी मिळाली आहे. ही बातमी जशी अभिषेक बच्चन याच्यापर्यंत पोहोचली, तोही आनंदी झाला.

‘कोणत्याही पुरस्कारापेक्षा चांगली बातमी’
अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याने दसवी (Dasvi) सिनेमाच्या जबरदस्त प्रभावाचे वर्णन “कोणत्याही पुरस्कारापेक्षा चांगले” असे केले. या यशाचे श्रेय त्याने ‘दसवी’चे दिग्दर्शक तुषार जलोटा (Tushar Jalota) आणि विद्यार्थ्यांना दिले. माध्यमांतील वृत्तानुसार, अभिषेक म्हणाला की, “जेव्हा तुम्ही तुमच्या सिनेमाचा सकारात्मक परिणाम पाहता, तेव्हा खऱ्या आयुष्यात तुम्ही अशा सिनेमाचा एक भाग होता, हे खूप छान वाटते. याचे श्रेय विद्यार्थी आणि माझे दिग्दर्शक तुषार यांना जाते. त्याचा सिनेमावरचा विश्वास आणि त्याला जी गोष्ट सांगायची होती. ही बातमी आम्हाला मिळालेल्या कोणत्याही पुरस्कार किंवा प्रशंसापेक्षा मोठी आहे.” त्याचवेळी या बातमीवर आपला आनंद शेअर करताना दिग्दर्शक तुषार जलोटा म्हणाले की, “अशी बातमी ऐकून मला खूप आनंद झाला.”

सिनेमाविषयी थोडक्यात
दसवीमध्ये अभिषेक बच्चनशिवाय यामी गौतम आणि निम्रत कौर यांच्याही मुख्य भूमिका आहेत. हा सिनेमा राजकारणी गंगाराम चौधरी यांच्या जीवनावर आहे. यामध्ये ते दहावीची परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी काय काय मेहनत घेतात, हे दाखवले आहे. हा सिनेमा ७ एप्रिल रोजी नेटफ्लिक्स आणि जिओसिनेमावर प्रदर्शित झाला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post