बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदीसाठी गेले काही महिने खूप कठीण गेले. जून २०२१ मध्ये अभिनेत्रीने आपला पती राज कौशलला कायमचे गमावले. पतीच्या मृत्यूनंतर मंदिरा एकटीच आपल्या दोन मुलांची काळजी घेत आहे. एवढेच नाही, तर अभिनेत्री एवढ्या मोठ्या दुःखातून बाहेर पडली आणि त्यानंतर काही दिवसांनी कामावरही परतली. यामुळे चाहत्यांनी अभिनेत्रीचे जोरदार कौतुक केले. त्याचबरोबर आता मंदिरा ‘द लव्ह लाईफ’ शोच्या तिसऱ्या सीझनमध्ये दिसली आहे. मंदिराने पती राज कौशलच्या मृत्यूनंतर चार महिन्यांनी एक मुलाखत दिली आहे, ज्यात तिने तिच्या मुलांना तिची ताकद असल्याचे सांगितले आहे.
मंदिरा बेदीने एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे, ज्यात तिने सांगितले की, राज कौशलशिवाय ती तिचे आयुष्य कसे चालवत आहे. एवढेच नाही, तर तिने असेही म्हटले की, ती तिच्या मुलांसाठी वडीलही बनत आहे. मंदिरा म्हणाली की, “माझ्यासाठी माझी मुले माझी प्रेरणा आहेत. मला माझ्या मुलांकडून काम करत राहण्यासाठी, स्वतःला चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळते. मी फक्त त्यांच्यासाठी सर्व काही करत आहे. मी माझ्या मुलांसाठी जिवंत आहे. ते माझी ताकद आहेत.” (mandira bedi said that my children are my strength after my husband death)
पुढे मंदिरा बेदी म्हणाली की, “माझी मुले माझ्या पुढे जाण्याचे आणि आयुष्यात चांगले होण्याचे सर्वात मोठे कारण आहेत. मी फक्त त्यांच्यासाठी धैर्य राखू शकलो. ते माझी ताकद आहेत. मी फक्त माझ्या मुलांसाठी कमावत आहे. मी त्यांच्यासाठी एक चांगली आई आणि वडील दोन्ही बनले आहे.”
पुढे ती म्हणाली की, “माझी कारकीर्द नेहमीच आव्हानांनी भरलेली आहे. माझ्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले, जेव्हा माझी कारकीर्द खाली जात होती. हे खरे आहे की, तुम्ही नेहमी तुमच्या शेवटच्या कामासाठी ओळखले जातात. जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल, त्याचा अनुभव अद्भुत असतो. जेव्हा तुम्ही अपयशाच्या काळात जगत असता, तेव्हा मग जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन तुमचा विचार बदलतो.”
मंदिरा बेदी इंडस्ट्रीची एक मजबूत अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ४९ वर्षीय मंदिराने टीव्ही मालिका आणि अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. एवढेच नाही, तर तिने २००३ आणि २००७ मध्ये क्रिकेट विश्वचषकाचे होस्टिंग केले होते.
दैनिक बोंबाबोंमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘तुझी माझी जोडी जमली’, गाण्यावर मानसीने पतीसोबत धरला ठेका; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘लय भारी’
-पिवळ्या रंगाच्या साडीत मितालीने दिल्या झक्कास पोझ; चाहताही म्हणाला, ‘खूप खूप जास्त सुंदर दिसताय’
-‘…खरचं साडीपेक्षा तू जास्त सुंदर दिसतेस’, श्रुती मराठेच्या फोटोवरील चाहत्यांची कमेंट ठरतेय लक्षवेधी