गेल्या महिन्यात अभिनेत्री मंदिरा बेदीच्या पतीचे हृदयविकराच्या झटक्याने दु:खद निधन झाल्याने, तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. मंदिरा बेदीचा पती राज कौशलच्या निधनानंतर मंदिरा तिचे जीवन पुन्हा ट्रॅकवर आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. अलीकडेच तिने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत एका नवीन सुरवातीकडे लक्ष वेधले आहे.
मंदिरा बेदीने सोमवारी एक पॉझिटिव्ह नोट शेअर केली आहे. त्यामध्ये तिने लिहिले आहे की, “I am worthy, I am capable, I am loved, I am strong… ” या नोटसोबत मंदिराने लिहिले की, “आता नवीन सुरुवात करण्याची वेळ आली आहे.” मंदिराच्या या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त करताना टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानीने लिहिले की, “एकदम बरोबर.” फराह खानने प्रतिक्रिया दिली की, “तुला खूप शक्ती मिळो.” मंदिरा बेदीच्या पोस्टवर अशा शब्दांत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
यापूर्वी मंदिरा बेदीने एक कौटुंबिक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये दोन मुले वीर आणि तारा याशिवाय तिचे पेरेंट्स देखील पाहायला मिळाले. मंदिराने लिहिले की, “माझ्या कुटुंबासाठी आणि प्रत्येकाचे प्रेम, समर्थन आणि दयाळूपणाबद्दल मी आभार व्यक्त करते.” असे तिने लिहिले आहे. (mandira bedi says its time to begin again in new post after husband raj kaushals demise)
राज कौशलच्या निधनानंतर मंदिराने गेल्या एका महिन्यात काही पोस्ट्स शेअर केल्या आहेत. यामध्ये तिने तिच्या पतीबरोबर वेळ घालवलेल्या फोटोंचा समावेश केला होता. एका पोस्टमध्ये मंदिराने राजबरोबर एक फोटो शेअर केला होता आणि लिहिले होते की, “२५ वर्षे एकमेकांना ओळखलं आहे, लग्नाची २३ वर्षे प्रत्येक संघर्ष आणि चढ-उतार यांमध्ये एकमेकांना साथ दिली आहे.
मंदिरा आणि राज यांचे १४ फेब्रुवारी १९९९ रोजी लग्न झाले होते. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. गेल्या वर्षी राज आणि मंदिराने मुलगी ताराला दत्तक घेतले होते. मंदिरा आणि राज यांची पहिली भेट १९९६ मध्ये मुकुल आनंदच्या घरी झाली होती. मंदिरा तेथे ऑडिशनसाठी पोहोचली होती आणि राज मुकुल आनंदचे सहाय्यक म्हणून काम करत होते. येथूनच दोघांच्या प्रेमाला सुरुवात झाली होती.
दरम्यान, मंदिरा बेदीचे पती राज कौशल याचे वयाच्या ४९ व्या वर्षी, ३० जून रोजी अचानक निधन झाले. पहाटे साडेचार वाजता राजला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. राजने एक अभिनेता म्हणून करिअरची सुरुवात केली. यानंतर त्याने आपल्या कारकीर्दीतील ‘प्यार में कभी कभी’, ‘शादी का लड्डू’ आणि ‘अँथनी कौन है’ सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अभिनेता ते साधूपर्यंत किस करण्यामुळे वादात राहिलीय शिल्पा शेट्टी; कोर्टाने जारी केला होता वॉरंट
-गौरीला ‘शक्ती : द पॉवर’मध्ये नव्हती आवडली शाहरुखची ओव्हर ऍक्टिंग; म्हणाली ‘सगळ्यात’ वाईट चित्रपट