मलायका अरोरा (Malaika Arora) ही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका तिच्या अभिनयाइतकीच तिच्या फिटनेसाठीही चांगलीच ओळखली जाते. सोशल मीडीयावर नेहमीच तिच्या फिटनेसची आणि ग्लॅमरस लूकची चर्चा होताना दिसते. तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असतात. मलायकाने नुकतीच अवॉर्ड शोमध्ये हजेरी लावली होती. यामध्ये तिची चालण्याची नक्कल केल्याने मनिष पॉलवर ती चांगलीच वैतागलेली दिसली. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ.
मलायका अरोरा बॉलिवूडच्या अशा काही अभिनेत्रींपैकी एक आहे ज्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. मलायका अरोराशी संबंधित कोणतीही पोस्ट प्रचंड व्हायरल होते. मलायकाचा जेव्हाही व्हिडिओ समोर येतो तेव्हा लोक तिच्या चालण्याची नक्कीच खिल्ली उडवतात. यावेळी मलायकाच्या चालीची चर्चा फिल्मफेअरमध्येही पाहायला मिळाली. सध्या सोशल मीडियावर फिल्मफेअरचे व्हिडिओ सर्वत्र आहेत. अशा परिस्थितीत एक व्हिडिओ खूप चर्चेत आहे, ज्यामध्ये शोचा होस्ट मनीष पॉल मलायकाच्या चालण्याची कॉपी करताना दिसत आहे.
View this post on Instagram
हा व्हिडिओ फिल्मफेअरच्या अधिकृत इन्स्टा पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये शोचा होस्ट मनीष पॉल स्टार्ससोबत विनोद करताना दिसत आहे. यादरम्यान तो मलायकासोबत बोलतानाही दिसत आहे. एवढेच नाही तर तो तिच्या चालण्याची नक्कल करतानाही दिसतो. मनीष पॉल मलायकाच्या चालण्याची नक्कल करतो तेव्हा मलायका स्वतःही बाकीच्या लोकांसोबत हसते. ती मनीष पॉलला त्याच्या चालण्याची स्टाईल पुन्हा दाखवायला सांगते. त्यानंतर मनीष पुन्हा त्याच मार्गाने चालतो. या व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
हेही वाचा – अवॉर्ड फंक्शनमध्ये रणवीरसिंगचा जलवा! अल्लू अर्जुन, यशसोबत घातला धुमाकूळ
तब्बल चार वेळा लग्न करून ‘ही’ अभिनेत्री आलेली चर्चेत, सध्या पाकिस्तानमध्ये ‘असे’ काढते आयुष्य
बापरे! नेहा कक्करने स्पर्धकाला पाहून जज करण्यास दिला नकार, कारण ऐकून बसेल धक्का