Tuesday, March 31, 2026
Home कॅलेंडर मणिकर्णिका रिटर्नमध्ये कंगना दिसणार ‘या’ राणीच्या भूमिकेत, शुटिंगपुर्वीच चित्रपटाची होतेय जोरदार चर्चा

मणिकर्णिका रिटर्नमध्ये कंगना दिसणार ‘या’ राणीच्या भूमिकेत, शुटिंगपुर्वीच चित्रपटाची होतेय जोरदार चर्चा

सध्या सतत वादात असलेली ‘क्वीन ऑफ बॉलिवूड’ म्हणजेच कंगना राणावतने आजच्या मकरसंक्रांतीच्या शुभ दिवशी तिच्या पुढच्या चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट कंगनाच्या ‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या सिरीजमधला पुढचा सिनेमा असणार आहे. कंगनाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून ‘मणिकर्णिका रिटर्न्स- द लीजेंड ऑफ़ दिद्दा’ या काश्मीरच्या राणीवर आधारित सिनेमाची घोषणा केली आहे.

‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटात कंगनाने राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारून सर्व प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता पुन्हा कंगना अशाच एका रणरागिणीची महती चित्रपटाच्या माध्यमातून पडद्यावर उतरवणार आहे. कंगना लवकरच ‘मणिकर्णिका रिटर्न्स’ या सिनेमात काश्मीरच्या राणीच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपट निर्माते कमल जैन यांच्यासोबत फोटो पोस्ट करत कंगनाने तिच्या या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे

https://twitter.com/KanganaTeam/status/1349632994080923649

कमल जैन सोबतचा फोटो शेअर करताना कंगनाने लिहिले की, ‘आपला देश झाशीच्या राणीसारख्या अनेक वीरांगनांच्या शौर्याचा साक्षी आहे. अशीच आणखी एक कोणाला माहित नसलेली वीरकथा म्हणजे काश्मीरच्या राणीची, ज्या राणीने महमुद गजनवीला एकदा नव्हे तर दोनदा पराभूत केले. लवकरच कमल जैन आणि मी ‘मणिकर्णिका रिटर्न्स: दि लिजेंड ऑफ दिद्दा’ प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहोत.’

राणी दिद्दाला वॉरियर क्वीन म्हटले जाते. या राणीने कठीण परिस्थिती असूनही अविभाजित काश्मीरवर जवळपास ४० वर्ष राज्य केले. या राणीच्या साम्राज्यात लोहारा राज्याचा देखील समावेश होता. प्राप्त माहितीनुसार कंगना या सिनेमाचे चित्रीकरण पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये सुरु करणार आहे. आता सध्या ती रजनीश घई यांच्या ‘धाकड’ आणि सर्वेश मेवाडी यांच्या ‘तेजस’ या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

नुकतेच तिने ए. एल. विजय यांच्या ‘थलाइवी’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले असून, हा सिनेमा तामिळनाडूच्या लोकप्रिय नेता आणि अभिनेत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे.

हे देखील वाचा