सोशल मीडियावर सध्या एक गाणे चांगलेच ट्रेंडिंग होत आहे. खरं तर हे गाणे ऐकल्यावर गाण्याचे बोल काही समजत नाहीत, पण गाणे ऐकल्यावर खूप छान वाटते. श्रीलंकन भाषेतील हे गाणे चांगलेच व्हायरल होत आहे. गाण्याचे इंस्टाग्रामवर अनेक रील्स देखील तयार होत आहेत. अनेक कलाकारांनी देखील या गाण्यावर रील्स तयार केले आहेत. अशातच ‘मनिके मागे हिते’ या गाण्याच्या संगीतावर मराठी व्हर्जनमध्ये गाणे तयार केले आहे.
श्रीलंकेतील योहानी हिने गायलेले ‘मनिके मागे हिते’ या गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. अशातच कोल्हापूरमधील कलाकार अपूर्वा नानिवडेकर सिंग हिने मराठी भाषेत या गाण्याच्या संगीतावर गाणे गायले आहे. या गाण्याला देखील सोशल मीडियावर जोरदार प्रतिसाद मिळत आहे. या मराठी गाण्याचे बोल ‘जगू कशी तुझ्याविना सांगू काय माझ्या मनाला’ हे आहेत. या गाण्यातील रॅपरचे नाव ए किंग हे आहे. (Manike mage ithe song’s Marathi version viral on internet)
त्यांच्या या गाण्याला सोशल मीडियावर तसेच यूट्यूबवर जोरदार प्रतिसाद मिळत आहे. गाण्यातील बोल देखील प्रेक्षकांना खूप भावत आहेत. या गाण्याचे श्रीलंकन व्हर्जन मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. त्याचप्रमाणे मराठी व्हर्जन देखील गाजत आहे. अपूर्वा नानिवडेकर सिंग हिचे सर्वत्र खूप कौतुक चालले आहे. व्हिडिओवर देखील नेतकऱ्यांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. या व्हिडिओला यूट्यूबवर आतापर्यंत १२ हजारांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
विशेष म्हणजे या गाण्याचे मराठीतच नाही, तर हिंदी, इंग्रजी, तमिळ आणि भोजपुरी व्हायरल झाले आहेत.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘रंग माझा वेगळा’ मालिकेने गाठला ५०० एपिसोड्सचा टप्पा, कलाकारांनी ‘अशा’प्रकारे साजरा केला खास क्षण
-ड्रग्ज प्रकरणी अभिनेता गौरव दीक्षितला मिळाला जामीन, पण कोर्टाने दिल्या ‘कडक’ सूचना
-कृष्णा अभिषेकने असे काय केले की, नेहा कक्करला कोसळले रडू? पाहा ‘हा’ व्हिडिओ










