Tuesday, October 14, 2025
Home अन्य ‘अल्लाह के बन्दे हंस…’ गात ‘या’ गायकाने 35व्या वयातच घेतला अखेरचा श्वास

‘अल्लाह के बन्दे हंस…’ गात ‘या’ गायकाने 35व्या वयातच घेतला अखेरचा श्वास

मनोरंजन क्षेत्रामधून दु:खदायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध मणिपुरी गायक सुरेन युमनाम यांचे निधन झाले आहे. यकृताच्या घातक आजाराशी झुंज देत होता. शेवटी त्याने उपचारादरम्यान अगदी 35 व्या वर्षी सुरनेने जगाचा निरोप घेतला. त्यामुळे कला शेत्रामध्ये शोककळा पसरली आहे. अनेक चाहते गायकाचा फोटो शेअर करत श्रद्धांजली वाहत आहेत. बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनीही सरुरेनला श्रद्धांजली देत पोस्ट शेअर केली आहे.

मणिरपुरी गायक सुरेन युमनाम (Suren Yumnam) याचे अगदी 25व्या वयात निधन झाल्यामुळे कला क्षेत्रामध्ये शोककळा पसरली आहे. त्याचे चाहते सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आपले दु:ख व्यक्त करत आहेत. तसेच बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर (Kailash Kher)यांनीही सुरेनला श्रद्धांजली वाहत आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरुन सुरेनचा जुना व्हिडिओ शेअर करत त्याला श्रद्धाजली वाहिली आहे.

कैलाश खेर यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सुरेन दवाखान्यात खाटावर उपचार घेताना दिसून येत आहे. त्याच्या आजूबाजूला उपचाराच्या मशिन दिसून येत आहे. अशा परिस्थितीतही तो आपल्या गाणं गात आहे. आयुष्य जर गाण्यमुळे बनलं असेल तर त्याचा शेवटही त्याने गाण्यानीच केला आहे. त्याने शेवटचा श्वास घेत असताना कैलाश खेर याचं ‘अल्हा के बंदे हसते’ हे गाणं गात नेहमीसाठी डोळे मिटले.

कैलाश यांनी हा व्हिडिओ शेअर करत भावनिक करणारे कॅप्श दिले होते. कॅप्शमध्ये लिहिले की होते की, “मणिपूरचे लाडके, सुप्रसिद्ध गायक सुरेन युम्नम यांनी त्यांच्या रुग्णालयातून “अल्लाह के बन्दे हंस दे” गाणे, आजारपणाला कंटाळून मणिपूरमधील स्वर्गीय निवासस्थानासाठी रवाना झाले. आपल्या सर्वांना हसतमुखाने जगण्याचा संदेश देऊन उद्याच्या दिवसात आणखी एक जीवन मिळेल. देवाचा स्वतःचा मार्ग. ॐ शांति.”

गायक सुरेन याने अनेक गाजणारे गाणे गाऊन चाहत्यांवर भुरळ घातली होती, जरी तो जागातून गेला असला तरी आपल्या मधुर आवाजाने तो सतत आपल्या चाहत्यांचया मनामध्ये जिवंत राहील. कैलाश खेर यांनी शेअर केलेला व्हिडिओने सगळ्यांनाच भावूक केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
खुशखबर! शाहरुखचा पठाण चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, चाहत्यांनी केला शुभेच्छाचा वर्षाव
वाद चांगलाच पेटला! शर्लिनने राखी सावंतला ‘टकली’ म्हणत वक्तव्याला दिले प्रतिउत्तर…

हे देखील वाचा