Saturday, March 29, 2025
Home टेलिव्हिजन बिग बॉसनंतर हे स्पर्धक ‘खतरों के खिलाडी १४ ‘मध्ये दिसणार; नावं झाली निश्चित ?

बिग बॉसनंतर हे स्पर्धक ‘खतरों के खिलाडी १४ ‘मध्ये दिसणार; नावं झाली निश्चित ?

बिग बॉसनंतर सर्वात लोकप्रिय रिआलटी शो म्हणजे खतरों के खिलाडी. या शोचा सीझन १४ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर अनेक चाहत्यांना या शोमध्ये कोण कोण भाग घेणार याची उत्सुकता लागली आहे. अशातच, मिळालेल्या माहितीनुसार, या शोमध्ये भाग घेणाऱ्यांची नावं निश्चित झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

एका रिपोर्टनुसार, मुनवर फारुकी रोहित शेट्टीच्या शोसाठी जवळपास निश्चित झाला होता. मात्र, आता नव्या मिळालेल्या माहितीनुसार, मुनावर फारुकीसह, मनारा चोप्राचे नावदेखील निश्चित झाल्याचे समजते. मात्र, अद्याप निर्मात्यांनी यासंदर्भात कोणतिही अधिकृत माहिती दिलेली नाही. तर काही दिवसांपूर्वी, अभिषेक कुमार याचे नाव समोर आले होते.

तसेच या शोसाठी आत्तापर्यंत मुनव्वर फारुकी, ईशा मालवीय, मनीषा रानी, विवेक दाहिया आणि शोएब इब्राहिम ही नावं समोर आली आहेत. खतरों के खिलाडीसाठी अभिषेक कुमार नाव निश्चित झाल्याची माहिती मिळाली आहे. पण त्याने यासाठी नकार दिला आहे.

या शोसाठी आयशा खान हिचे नावंदेखील चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आयशाला खतरों के खिलाडी शोमध्ये भाग घेणार आहेस का? असे विचारले असता. तिनं इच्छा असल्याचे सांगतिले. मला जर संधी मिळाली तर मी नक्की भाग घेणार असल्याचे आयशाने म्हटले होते.

खतरों के खिलाडी सीझन 14 बद्दल सांगायचे झाले तर, या शोचे शूटिंग एप्रिलच्या शेवटी किंवा मे महिन्यात सुरू होईल. दरवर्षी रोहित शेट्टीच्या शोचे शूटिंग दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये होत असले तरी यावेळी त्याचे लोकेशन काय असेल, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. माधुरी दीक्षित आणि सुनील शेट्टी यांचा शो संपल्यानंतर, ‘खतरों के खिलाडी’चा सीझन १४ जुलै महिन्यात प्रसारित होऊ शकतो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

महाभारत फेम नितीश भारद्वाज यांच्या आरोपावर आता IAS पत्नीची प्रतिक्रिया, म्हणाली…
‘मला चित्रपट करण्यात रस नाही, माझी काळजी करू नका’ आयेशा टाकियाने मांडले मत

हे देखील वाचा