Sunday, February 23, 2025
Home बॉलीवूड अभिनेता मनोज बाजपेयीच्या सासूचे दिल्लीमध्ये निधन, वर्षभरात घरात झाला तिसरा मृत्यू

अभिनेता मनोज बाजपेयीच्या सासूचे दिल्लीमध्ये निधन, वर्षभरात घरात झाला तिसरा मृत्यू

अभिनेता मनोज बाजपेयी याची पत्नी शबाना रजा उर्फ नेहाची आई शकीला रजा यांचे गुरुवारी (१० फेब्रुवारी) रोजी सकाळी दिल्लीमध्ये निधन झाले आहे. मागील अनेक दिवसांपासून त्या गंभीर आजाराशी लढत होत्या ही दुःखद बातमी ऐकताच त्यांच्या कुटुंबीयांना खूप दुःख झाले आहे. सगळेजण मुंबईवरून दिल्लीला रवाना झाले आहेत.

मनोज बाजपेयीच्या सासूला १२ वर्षापासून कॅन्सर आहे. त्याची पत्नी शबानाने मागच्याच वर्षी तिच्या वडिलांना गमावले आहे. अशातच तिच्या आईने देखील शेवटचा श्वास घेतल्याने तिला खूप दुःख झाले आहे. (Manoj bajpeyee mother in low death, he reached to Delli)

अभिनेत्याच्या घरातील हे तिसरे निधन आहे. त्याचे वडील आर के बाजपेयी यांचे देखील मागच्या वर्षी निधन झाले आहे. ते ८३ वर्षांचे होते. अशातच त्याच्या सासुचा देखील मृत्यू झाल्याने त्याला खूप दुःख झाले आहे. तो लगेच दिल्लीला रवाना झाला आहे.

त्याच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तो लोकप्रिय वेसीरिज ‘द फॅमिली मॅन’च्या तिसऱ्या सिझनमध्ये दिसणार आहे. तसेच तो अभिषेक चौबेसोबत ‘अनटायटल डार्क कॉमेडी’ या चित्रपटाची शूटिंग चालू आहे. जो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा