Saturday, December 21, 2024
[aioseo_breadcrumbs]

मुघलांना ‘डाकू’ म्हटल्यामुळे ‘या’ कलाकारांच्या निशाण्यावर आले मनोज मुंतशीर; ऋचा म्हणतेय, ‘खूपच बकवास…’

आतापर्यंत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जातीपातीचे राजकारण तुम्ही पाहिले असेल. एखाद्या ठराविक जातीवरून, समुदायावरून राजकारणी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. असाच काही प्रकार आता मनोरंजन विश्वात देखील होताना दिसत आहे. ‘मुघल’ या समुदायावरून सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आपल्या प्रतिक्रिया देत आहेत, मते मांडत आहेत. त्याच्या या प्रतिक्रियांवरून काहींना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे, तर काहींवर कमेंट्स मधून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मनोरंजन विश्वातील गीतजकार मनोज मुंतशीर हे सध्या मुघलांवरील एका वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत आहेत. मनोज यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे नेटकऱ्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वांच्या चर्चेचा ते भाग बनले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे काहींनी मनोज यांचे समर्थन केले. तर काहींनी त्यांच्यावर टीका करत त्यांना ट्रोलही केले. (manoj muntashir called mughal dacoits in his video richa chadha criticised it by calling cringe and bad poetry)

गीतजकार मनोज मुंतशीर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून मंगळवार (२४ ऑगस्ट) एक व्हिडीओ शेअर केला होता. ‘आप किसके वंशज है’ असे त्याचे शीर्षक होते. या व्हिडिओमध्ये त्यांनी मुघलांच्या इतिहासाचा उल्लेख करत त्यांना ‘डकैत’ असे संबोधले. या व्हिडिओमध्ये मुघलांवर जहरी टीका केली आहे. प्राथमिक शिक्षण घेत असतानापासूनच त्यांनी आपली मती कशी गुंग केली, हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.

मनोज या व्हिडिओमध्ये म्हणाले की, “गेल्या अनेक दिवसांपासून आपण आपल्या इतिहासाच्या धरतीवरील अनेक गोष्टी लावारिस सोडल्या आहेत. आपले विचार एवढे बदलवून टाकले आहेत की, आपल्या प्राथमिक विद्यालयातील पुस्तकांमध्ये ग गणपतीचा ऐवजी ग गाढवाचा असं लिहिलं गेलं. तरी आपल्याला काहीच फरक पडला नाही. आपल्या घराकडे येणाऱ्या रस्त्यांना देखील अकबर, हुमायून, जहांगिर अशा डाकूंची नावे ठेवली गेली आणि आपण टाळ्या वाजवत या रस्त्याचे उद्घाटन करणाऱ्या राजकारण्यांना बघत राहिलो.” पुढे मनोज यांनी चित्तोडगडचा देखील उल्लेख केला. ते म्हणाले,” चितोडगड मध्ये जिहादच्या नावावर खून करणारा आदर्श राजा होता का? मीना बाजार लावणारा जिल्लेलाही. हा जिल्लेलाही म्हणजे खुदाची सावली, तर मग हा कोणता खुदा आहे, ज्याची सावली एवढी काळी आहे. आपले नायक आणि खलनायक जात पात सोडून निवडा.”

यामध्ये त्यांनी रावणाविषयी देखील उल्लेख केला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, जे चूक आहे त्याला आपण चूकच बोललं पाहिजे. उगाच एखाद्या चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणे योग्य नाही. त्यांच्या व्हिडीओवर ऋचा चढ्ढाने ट्वीट केले आहे की, “ही खूपच बकवास कविता आहे आणि अजिबात बघण्यालायक नाही. तुम्ही तुमचं आडनाव काढून टाकलं पाहिजे. ज्या नावाचा तुम्ही तिरस्कार करतात, ते नाव घेऊन तुम्ही पैसे कसे काय कमावता.” खरंतर ती मनोज यांच्या मुंतशीर या आडनावावरून बोलत होती. ऋचा बरोबरच नीरज घायवान यांनी देखील मनोज यांच्या व्हिडिओवर टीका केली.

मनोज यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडीओमुळे आता सर्वत्र त्यांचीच चर्चा सुरु आहे. या आधी देखील कबीर खान यांनी मुघलांच्या समर्थानात वक्तव्य केले होते. मनोज यांच्या पोस्टवर चित्रपट निर्माते विवेक रंजन आणि अग्निहोत्री यांनी त्यांच्या समर्थनार्थ वक्तव्य केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राज कुंद्राच्या अटकेदरम्यान शिल्पा शेट्टीने शेअर केली पोस्ट; म्हणाली, ‘मी चूक केलीय…’

-ज्याला राम गोपाल वर्मा म्हणाले होते, ‘हा मी नाही’; तोच व्हिडिओ शेअर करत इनाया म्हणतेय, ‘हे आम्हीच…’

केबीसी: उत्तर माहित असूनही स्पर्धक आशीष सुवर्णाने घेतली नाही रिस्क, ‘या’ प्रश्नावर क्विट करत सोडला शो

हे देखील वाचा