भोजपुरी सिनेसृष्टीतून मोठी बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेता दिनेश लाल यादव म्हणजेच निरहुआ याने आझमगड लोकसभा जागेवर भाजप पोटनिवडणूकीत शानदार विजय मिळवला. यामुळे विजयानंतर भाजप नेता निरहुआ याच्यावर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच भोजपुरी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता आणि भारतीय जनता पक्षाचे नेता मनोज तिवारी यांनीही आपला खास मित्र असलेल्या निरहुआ याला अनोख्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच आझमगडच्या विकासाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
मनोज तिवारी यांच्याकडून निरहुआला शुभेच्छा
विशेष म्हणजे, दिनेश लाल यादव निरहुआ (Dinesh Lal Yadav Nirahua) याने रविवारी (दि. २६ जून) आझमगडच्या निवडणूक निकालांमध्ये सपाच्या धर्मेंद्र यादव यांचा पराभव केला. अशात ईशान्य दिल्लीतील भाजप खासदार मनोज तिवारी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करत शुभेच्छा दिल्या.
“धाकटा भाऊ दिनेश लाल यादव निरहुआ याचे लोकसभेत स्वागत आहे. आता आझमगडमध्ये खासदार म्हणजे काय हा फरक स्पष्टपणे दिसून येईल. आझमगडच्या जनतेचे खूप खूप आभार,” असे मनोज तिवारी यांनी निरहुआच्या निवडणुकीतील विजयाचे ट्वीट रिट्विट करताना असे म्हटले आहे. दिनेश लाल यादव निरहुआ आणि मनोज तिवारी हे खऱ्या आयुष्यातही चांगले मित्र आहेत.
लोकसभा में छोटे भाई @nirahua1 का स्वागत है .. अब #Azamgarh को फ़र्क़ दिखेगा कि सांसद होता क्या है.. आज़मगढ़ की जनता को कोटि कोटि धन्यवाद .. @myogiadityanath @swatantrabjp @JPNadda @AmitShah @narendramodi ???? https://t.co/v98I7OzLDU
— Manoj Tiwari ???????? (@ManojTiwariMP) June 26, 2022
या भोजपुरी कलाकारांनीही निरहुआला दिल्या शुभेच्छा
खरं तर दिनेश लाल यादव म्हणजेच निरहुआ याला आझमगड निवडणुकीत जिंकल्यानंतर अनेक मोठ्या व्यक्तींनी शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये भोजपुरी इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या नावांची समावेश आहे. मनोज तिवारीपूर्वी भोजपुरीमध्ये कलाकार खेसारी लाल यादव, रवी किशन आणि अभिनेत्री आम्रपाली दुबे यांनीही निरहुआच्या खासदार बनल्यानंतर शुभेच्छा दिल्या आहेत.
दिनेश लाल यादव कारकीर्द
दिनेश लाल यादवबद्दल बोलायचं झालं, तर त्याचा जन्म २२ मार्च, १९७९ रोजी उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथे झाला होता. त्याने २००६ साली आलेल्या ‘चलत मुसाफिर मोह लियो रे’ या भोजपुरी सिनेमातून सिनेमात पदार्पण केले होते. पुढे त्याने अनेक सिनेमात काम केले. त्याच्या नावावर एका वर्षात ५ हिट सिनेमे देण्याचा विक्रम आहे. त्या सिनेमांमध्ये ‘पटना से पाकिस्तान’, ‘निरहुआ रिक्शेवाला २’, ‘जिगरवाला’, ‘राजाबाबू’ आणि ‘गुलामी’ यांचा समावेश आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-