Friday, February 21, 2025
Home बॉलीवूड “मला चित्रपटात काम करायचे नव्हते तसे करायचे असते तर….” मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने केला होता करियरबद्दल खुलासा

“मला चित्रपटात काम करायचे नव्हते तसे करायचे असते तर….” मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने केला होता करियरबद्दल खुलासा

अभिनेता अक्षय कुमारचा मोठा गाजावाजा करून ‘पृथ्वीराज’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि दणकून आपटला. या सिनेमातून मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने चित्रपटांमध्ये पदार्पण केले. चित्रपटात ती आणि अक्षय कुमार मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले. या चित्रपटामुळे मानुषी छिल्लर चांगलीच चर्चेत आली होती. आज मानुषी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊया तिच्याबद्दल माहिती.

मानुषी छिल्लरचा जन्म हरियाणा मध्ये झाला होता. तिचे बालपण आणि शालेय शिक्षण दिल्लीमध्येच झाले. मानुषी एमबीबीएसचे शिक्षण घेत होती. याचकाळात २०१७ मध्ये तिची मिसवल्ड म्हणून अवघ्या २० व्या वर्षी निवड झाली. मिसवल्ड म्हणून निवड झाल्यानंतर मानुषीला अनेक चित्रपटांच्या ऑफर यायला लागल्या होत्या. पण या सगळ्या ऑफर मानुषीने धूडकावून लावल्या. कारण अभिनय करणे आपल्याला जमणार नाही, हे तिने पक्के ठरवले होते. पण त्यानंतर तिला अभिनेता अक्षय कुमारसोबत पृथ्वीराज चित्रपटात काम करण्याची ऑफर मिळाली. ज्याला तिने होकार दिला. अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लरचा हा चित्रपट महान सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manushi Chhillar (@manushi_chhillar)

चित्रपटात अक्षय कुमारने पृथ्वीराज चौहान यांची तर मानुषीने संयोगिताची भूमिका साकारली आहे. दोघांचीही प्रेमकथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. पण अलिकडेच एका मुलाखतीत बोलताना मानुषीने सांगितले की, “ती अभिनेत्री म्हणून नाव कमवायला कधीही मुंबईत आली नव्हती. शाळेत असताना तिने अनेक नाटकांमध्ये काम केले होते. मात्र अभिनय आणि डान्स यांमध्ये मला काहीही रस नव्हता. चित्रपटात काम करायचे असते तर मी पृथ्वीराज आधी अनेक चित्रपटांमध्ये झळकले असते” असेही तिने बोलून दाखवले.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
स्वतःचाच “त्या” सिनेमातील अभिनय पाहून दुखावलेल्या सतीश शाह यांनी ‘या’ कारणासाठी सोडले अभिनय क्षेत्र?
परी म्हणू की सुंदरा! कान्समध्ये साराच्या ड्रेसने वेधले सर्वांचे लक्ष, फाेटाे व्हायरल

हे देखील वाचा