Monday, April 15, 2024

स्वतःचाच “त्या” सिनेमातील अभिनय पाहून दुखावलेल्या सतीश शाह यांनी ‘या’ कारणासाठी सोडले अभिनय क्षेत्र?

आज आपण बॉलिवूडमध्ये पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, अनेक दिग्गज कलाकार ज्यांनी मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत आपल्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले. मात्र, असे कलाकार काही काळानंतर अचानक या ग्लॅमर जगातून नाहीसे झाले. लोकांना त्यांना पाहण्याची इच्छा असूनही त्यांनी मात्र अभिनयाला रामराम ठोकला. यामागची कारणं प्रत्येकाची वेगवेगळी असली तरी काहींनी मात्र त्यांच्या अभिनयात झालेल्या चुकीची जाणीव म्हणून देखील या क्षेत्राची रजा घेतली.

असेच एक कलाकार म्हणजे सतीश शहा. रंगभूमीपासून ते मालिका, चित्रपट आदी सर्वच मनोरंजनाच्या माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची दमदार झलक दाखवणाऱ्या सतीश शाह यांना ओळखत नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. सतीश शाह यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक उत्तम भूमिका साकारल्या. खासकरून विनोदी भूमिकांमध्ये त्यांनी विशेष छाप पडली. मात्र मागील बऱ्याच वर्षांपासुन सतीश चित्रपटांपासून लांब आहेत. नक्की असे काय झाले की, सतीश यांना या क्षेत्रापासून दूर जावे लागले. चला तर आज रविवारी (25 जुन)ला अभिनेत्तयाच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया…

सतीश शाह यांना त्यांच्या या क्षेत्राला सोडण्याचे कारण जेव्हा विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले, “मला नक्की माहित नाही, मात्र जर मला पुन्हा अभिनय करावासा वाटलं तर मी नक्की करेल. मी फक्त पैशासाठी चित्रपट करु शकत नाही. जेव्हा मला आतून प्रेरणा मिळते तेव्हाच मी कोणताही चित्रपट करण्यास होकार देतो. माझा शेवटचा प्रदर्शित झालेला चित्रपट होता 2014 साली आलेला ‘हमशकल्स’. हा सिनेमा केल्यानंतर कदाचित मी आतूनच जरा नाराज झालो आहे.”

पुढे सतीश शहा म्हणाले, “चित्रपटाला मी होकार दिल्यामुळे मला सांगितलेले सर्व मला करणे भाग होते. मात्र हा माझ्या विनोदाचा प्रकार नव्हता. अनेकांनी मला सांगितले की, नक्कीच चांगले, प्रभावी आहे, मात्र त्यामुळे चित्रपट तयार होत नाही.” ‘हमशकल्स’ या चित्रपटात सतीश यांनी जी भूमिका केली त्यासाठी ते अजिबातच समाधानी नव्हते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जेव्हा त्यांनी स्वतःला त्या भूमिकेत पाहिले तेव्हा त्यांना ते रुचले नाही आणि त्यातच त्यांनी कुठे ना कुठे ठरवून टाकले की, आपण अभिनय करायचा नाही. दरम्यान 2014 साली आलेला ‘हमशकल्स’ बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला होता.

अधिक वाचा:
Death Anniversary: ऑक्सिजनच्या बेडवर झोपायचा 150 वर्षे जगण्याची इच्छा असणारा मायकल; 12 डॉक्टर्स रोज करायचे तपासणी

एका मालिकेत सतीश शाह यांनी निभावल्या होत्या 50 वेगवेगळ्या भूमिका, असा आहे करिअरचा आलेख

हे देखील वाचा