Friday, August 1, 2025
Home मराठी जे कृत्यच पाशवी, अमानवी आहे… त्याला शिक्षा तरी मानवी का असावी ? बदलापूर घटनेवर अभिजित केळकरची संतापजनक पोस्ट…

जे कृत्यच पाशवी, अमानवी आहे… त्याला शिक्षा तरी मानवी का असावी ? बदलापूर घटनेवर अभिजित केळकरची संतापजनक पोस्ट…

काही दिवसांपासून महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या अनेक पाशवी घटना देशभरातून समोर येत आहेत. नुकत्याच झालेल्या कोलकत्ता बलात्कार आणि खोन प्रकरणानंतर बदलापूर मध्ये देखील शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची बातमी समोर आली आहे. याबाबत मराठी अभिनेता अभिजित केळकरने एक पोस्ट शेयर केली आहे. 

अभिजितने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंट वर स्टोरी द्वारे बदलापूर येथे घडलेल्या घटनेवर भाष्य केलंय. यात त्याने तीव्र शब्दांत त्याचा संताप व्यक्त केला आहे. या पोस्ट द्वारे त्याने एक प्रश्न विचारला आहे. ‘ जे कृत्यच पाशवी, अमानवी आहे… त्याला शिक्षा तरी मानवी का असावी ? असा थेट सवाल अभिजितने केला आहे. समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनांवर अभिजित नेहमी बोलत असतो.

बदलापूर येथील एका नामांकित शाळेत माणुसकीच्या नावाला कलंक लावणारी घटना घडली आहे. या शाळेत काम करणाऱ्या एका कर्मचार्याने दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केले आहेत. मुलींनी घरी याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली व त्यानंतर हि धक्कादायक बाब समोर आली. हा प्रकार १२ आणि १३ ऑगस्ट दरम्यान घडला होता. 

शाळा हि जागा मुलांसाठी अगदी घरासारखीच सुरक्षित असायला हवी परंतु अशा घटना जेव्हा घडतात त्यावेळी पालकांना आणि नागरिक म्हणून प्रत्येकालाच संताप येणे अनावर आहे. यामुळेच संतप्त पालकांनी बदलापूर स्थानकावर आज रस्ता रोको आंदोलन केले.      

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

आपल्याकडे शिवाजी आणि संभाजी असे खरेखुरे सुपरहिरो आहेत! विकीच्या वक्तव्याने जिंकली मने…

हे देखील वाचा