Sunday, September 8, 2024
Home बॉलीवूड आपल्याकडे शिवाजी आणि संभाजी असे खरेखुरे सुपरहिरो आहेत! विकीच्या वक्तव्याने जिंकली मने…

आपल्याकडे शिवाजी आणि संभाजी असे खरेखुरे सुपरहिरो आहेत! विकीच्या वक्तव्याने जिंकली मने…

विकी कौशलच्या बहुप्रतीक्षित ‘छावा‘ या सिनेमाचा टीझर काल प्रदर्शित झाला. या सिनेमात विकी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका निभावतो आहे. एका मिनिटांच्या टीझरने सोशल मिडीयावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सगळीकडून विकिची वाहवा होत आहे. टीझर मध्ये विकी अतिशय जबरदस्त अंदाजात बघायला मिळतो आहे. चित्रपट अतिशय भव्य दिव्य दिसत आहे. टीझर लॉन्च च्या कार्यक्रमात विकीच्या एका वक्तव्याने त्याने आता चाहत्यांची मने पुन्हा एकदा जिंकली आहे.  

टीझर लॉन्च प्रसंगी विकी कौशल म्हणाला की, परदेशात सुपरहिरो वगेरे टाईपचे सिनेमे बनवण्याची आवश्यकता तरी असते. कारण त्यांच्याकडे तसे सुपर हिरो नाहीयेत. मात्र आपल्याकडे असे खोटे सुपर हिरो सिनेमे बनवण्याची अवश्यकता नाहीये. भारताच्या इतिहासात डोकावून बघितलं तर आपल्याला दिसतं की आपल्याकडे शिवाजी आणि संभाजी असे खरेखुरे सुपरहिरो आहेत. अशा महान व्यक्तींसमोर सगळे सुपरहिरो फेल आहेत. अशा प्रेरणादायी व्यक्तीमत्त्वांना आपण सेलिब्रेट केलं पाहिजे. 

‘छावा’चा हा टीझर प्रेक्षकांना अतिशय आवडला आहे. ‘छावा’ मराठमोळे दिग्दर्शक लक्षमण उतेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. सिनेमात रश्मिका मंधना आणि अक्षय खन्ना देखिल प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट येत्या ६ डिसेम्बर रोजी प्रदर्शित होणार आहे.   

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

‘हा प्रत्येक सिनेमात स्वतःलाच कास्ट करतो’! टीकेवर सोडले अभिषेक बॅनर्जीने मौन…

 

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा