मराठी सिनेसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता अभिजित केळकर याने अनेक चित्रपटांमध्ये काम करुन इंडस्ट्रीमध्ये वेगळेच स्थान निर्माण केले आहे. अभिनेता सोशसल मिडियावर नेहमी सक्रिय असोत, त्याशिवया तो देशातील समाजकल्याानवरही ठामपणे आपली मतही व्यक्त करत असतो. त्याने नुकतंच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे अभिनेता खुपच चर्चेत आला आहे.
मराठी चित्रपाटतील प्रसिद्ध अभिनेता अभिजित केळकर (Abhijeet Kelkar) याने सोशल मीडिवर एक पोस्ट शेअर करत त्याने महाराष्ट्रातील नागपुर-मुंबई समृद्धी महामार्गा बद्दल आपले मत व्यक्त केले आहे. या माहामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या 520 किमी टप्प्याचे लोकार्पण (दि,11डिसेंबर) रोजी पंतप्रधान नरेंद्र (Narendra Modi) मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पूर्वी नागपुर ते शिर्डी वरुन जायला 10 लागायचे मात्र, हा माहामार्ग खुला झाल्यानंतर नागपुर ते शिर्डी फक्त 5 तासात अंतर कापता येइल. या उद्घाटनाबद्दल अभिनेत्याची एक पोस्ट फारच चर्चेत आली आहे.
अभिजित केळकर याने पोस्ट शेअर करतलिहिले की, “आमचं कोकणही ‘समृद्धी’ची वाट बघतंय…गेली 12 वर्षे” असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याने एमोजीमधून संताप व्यक्त केला असून त्याच्या पोस्टवर चाहतेही व्यक्त होताना दिसूत येत आहेत. एका युजरने लिहिले की, “कोकणी जनतेला आश्वासनांचे गाजर दाखवून समृध्दी नेली तिकडे.” तर दुसऱ्या युजरने लिहिले की, “बरोबर आहे दादा सध्या तर खूप गरज आहे..” म्हणत काही प्रेक्षक त्याला पाठिंबा देत आहे तर काही त्याला ट्रोल करत आहेत.
View this post on Instagram
अभिजितने चित्रपटांसह मराठी वाहिनीवरील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. अभिनेता सोशल मीडिवरुन सतत प्रेक्षकांचे नोरंजन करत असतो. त्याशिवाय त्याने मराठी बिग बॉसमध्येही सहभाग घेतला होता. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहतावर्ग त्याला फोलो करत असतो.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
धक्कादयक! ‘नॅशनल’ क्रश रश्मिका मंदानाला कन्नड इंडस्ट्रीने केले बॅन, कारण ऐकून तुम्हालाही बसेन धक्का
खुशखबर! ‘चंद्रमुखी 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, बॉलिवूडमधील ‘ही’ अभिनेत्री साकारतेय मुख्य भूमिका










