‘फुलपाखरू’ मालिकेतील ‘या’ देखण्या अभिनेत्याने केला व्यवसाय सुरू, कलाकारांनी लावली ओपनिंगला हजेरी


चित्रपटसृष्टीमध्ये असे अनेक कलाकार आहेत, जे अभिनयासोबत त्यांचा व्यवसाय करत आहेत. आयुष्यातील करिअरमधला दुसरा मार्ग ते नेहमीच तयार ठेवत असतात. अशाच एका मराठमोळ्या कलाकाराने त्याचा स्वतःचा व्यवसाय तयार केला आहे. तो अभिनेता म्हणजे यशोमन आपटे (yashoman apte). झी युवावरील ‘फुलपाखरू‘ या मालिकेत यशोमन मुख्य भूमिकेत होता. त्याच्या मानस या पात्राने त्याला सर्वात ओळख निर्माण करून दिली. मालिकेत त्याच्यासोबत ऋता दुर्गुळे  होती. त्यांची जोडी सगळ्यांना खूप आवडत होती. मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळवले. त्यानंतर यशोमन काही कामे करत होता. अशातच त्याने त्याचा स्वतःचा व्यवसाय सुरू केल्याची बातमी समोर आली आहे.

यशोमनने त्याचे स्वतःचे कॅफे सुरू केले आहे. त्याच्या कॅफेच्या उदघाटनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, या व्हिडिओच्या सुरुवातीला यशोमन त्याच्या कॅफेमध्ये प्रवेश करतो, तेव्हा तिथे फुग्यांनी डेकोरेशन केलेले असते. तो आत जातो, तेव्हा खुर्च्यांवर सगळे ग्राहक बसलेले असतात. या वेळी तिथे काही कलाकार देखील उपस्थिती होते. तिथे स्वानंदी टिकेकर, अभिजित केळकर आणि रूपाल नंद हे कलाकार उपस्थित होते. (yashoman apate started new business)

त्याच्या या कॅफेचे नाव ‘कॅप्टन कुल’ असे आहे. त्याने ठाण्यात त्याचे हे कॅफे सुरू केले आहे. तसेच कॅफेचे ओपनिंग झाले आहे. या पोस्टवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत आणि त्याचे अभिनंदन करत आहेत. अभिनयासोबत त्याने केलेली ही नवी सुरुवात नक्कीच त्याला भविष्याला एक वेगळे वळण देणार आहे.

यशोमन ‘फुलपाखरू’ या मालिकेनंतर खूपच लोकप्रिय झाला. सोशल मीडियावर देखील तो मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. तो सर्वात आधी ‘संत ज्ञानेश्वर’ या मालिकेत दिसला होता. त्याने ‘तुझ्याविना’, ‘झोपाळा’, बीपी’, ‘लौट आवो गौरी’, ‘३५ टक्के काठावर पास’, ‘श्रीमंताघरची सून’, ‘तू अशी जवळी राहा’ यांसारख्या चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम केले आहे.

हेही वाचा : 


Latest Post

error: Content is protected !!