‘मला पोलीस किंवा आर्मीमध्ये भरती होऊन करायची होती देशसेवा, पण…’, म्हणत मराठमोळ्या आकाश ठोसरने शेअर केले रक्तदान करतानाचे फोटो

marathi actor akash thosar donating blood for needy people and requesting all to do the same


संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या संकटाशी झुंज देत आहे, तर काही राज्यांना त्याचा अधिक त्रास जाणवत आहे. महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती अद्याप नियंत्रणात नाही. संपूर्ण देश एकत्रपणे साथीच्या रोगाला लढा देत आहे. तसेच, देशभरात गेल्या काही महिन्यांपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. याव्यतिरिक्त देशात रुग्णांसाठी, अधिकाधिक रक्तदानाची गरज भासत आहे. अशा परिस्थितीत, अभिनेता आकाश ठोसरने आपला रक्तदानाचा फोटो शेअर करत, निरोगी व्यक्तींना रक्तदान कारण्याचे आवाहन केले आहे.

आकाश ठोसरने हा फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यात तो रक्तदान शिबिरामध्ये, रक्तदान करताना दिसत आहे. फोटो शेअर करत, त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आपल्या प्रत्येकाला वाटतं असतं की, देशासाठी काहीतरी करावं, उपयोगी पडावं. मला लहानपणी पोलीस किंवा आर्मीमध्ये भरती होऊन देशसेवा करायची होती, पण ते शक्य झालं नाही. आज कोरोनाच्या लढ्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक लोक आपल्यासाठी झटत आहेत, ते देशसेवाच करत आहेत. मग आपल्यालाही काय करता येईल?”

कॅप्शनमध्ये पुढे त्याने लिहिले की, “कोरोनामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. त्यातच रक्ताचाही तुटवडा भासतोय. १ मे पासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होत आहे. या काळात १८ वर्षांवरील सर्वांना लस घेता येणार आहे. पण एकदा लस घेतल्यानंतर, पुढील ६० दिवस म्हणजेच २ महिने रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे या तिसऱ्या टप्प्यात लस घेणाऱ्यांनी आधी रक्तदान करणं गरजेचं आहे. कोरोनातून बरे झालेल्यांनी प्लाझ्मा दान आणि बाकीच्यांनी रक्तदान…” असे म्हणत आकाशने नागरिकांना रक्तदान करत, या लढ्यात सहभागी व्हायचे आवाहन केले आहे. हे पाहता सोशल मीडियावर अभिनेत्याचे खूप कौतुक केले जात आहे.

मे महिन्याच्या १ तारखेपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होणार होती. या टप्प्यात १८ वर्षांपेक्षा पुढच्या नागरिकांना लस देण्यात येणार होती. मात्र पुरेश्या लशी उपलब्ध नसल्याने, हे लसीकरण रद्द करण्यात आले आहे. हे लसीकरण लवकरच करण्यात येईल, मात्र याची तारीख अद्याप समोर आलेली नाही.

आकाश ठोसरबद्दल बोलायचे झाले, तर त्याने नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटात अभिनय करून, प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. या चित्रपटाने त्याला एका रात्रीत यशाच्या शिखरावर पोहचवले. यानंतर तो ‘एफ यु’, ‘लस्ट स्टोरीज’ मध्ये दिसला. आता आकाश महानायक अमिताभ बच्चन अभिनित ‘झुंड’ या आगामी चित्रपटातही दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काळीज तोडणारी बातमी! अभिनेत्री स्नेहा वाघच्या वडिलांचे निधन, पोस्ट शेअर करत दिली माहिती

-कोरोना काळात औषधांचा काळा बाजार करणाऱ्यांवर संतापला अभिनेता आर माधवन; म्हणाला…

-‘कपडे काढ, मग कळेल तू भूमिकेसाठी योग्य आहेस की नाही!’ ग्लॅमरच्या विश्वाबद्दल अभिनेत्रीने केला मोठा खुलासा


Leave A Reply

Your email address will not be published.