बॉलिवूड मधील अनेक कलाकारांची मुले जन्माला येताच प्रसिद्धीच्या झोत्यात असतात. यात करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर तर सगळ्यात अव्वल स्थानी आहे. बॉलिवूड प्रमाणेच मराठीसृष्टीतील अनेक कलाकारांची मुले देखील खूप प्रसिद्ध आहेत. यात समावेश आहे, तो म्हणजे अभिनेता अंशुमन विचारे याच्या मुलीचा. तो नेहमीच त्याच्या मुलीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्यामुळे सध्या अन्वी सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय झाली आहे. त्याचे चाहते देखील अन्वीच्या व्हिडिओला भरभरून प्रेम देत असतात. तिचे बोबडे बोल सगळ्यांनाच तिच्याकडे आकर्षित करतात.
नुकताच अंशुमनने अन्वीचा एक व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती सगळ्यांना ‘घरातून बाहेर जाऊ नको, बाहेर कोरोना आहे’ असे सांगत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अंशुमनची पत्नी अन्वीला विचारते की, ‘तू काय करत आहेस?’ तर त्यावर अन्वी म्हणते की, ‘मी घरात वॉक करत आहे.’ तिची आई म्हणते की, ‘अग पण वॉक घरात नाही करत ना.’ त्यावर अन्वी म्हणते की, ‘बाहेर कोरोना आहे ना, मग घरातच बसायचं बाहेर नाही जायचं.’
अशाप्रकारे या माय-लेकीचा एक सुंदर संवाद चाललेला आहे. यामध्ये अन्वी सांगत आहे की, ‘सगळ्यांनी घरातच बसा. बाहेर पोलीस आहेत आणि ते तुम्हाला पकडतील.’ जेव्हा अंशुमन तिला सांगतो की, ‘हे सगळं तू लोकांना सांग,’ तेव्हा अन्वी खोटा खोटा लोकांना कॉल करते आणि म्हणते की, ‘बाहेर कोरोना आहे तुम्ही घरातच बसा.’
अन्वीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अंशुमनचे चाहते या व्हिडिओवर कमेंट करून या चिमुकलीचे कौतुक करत आहे.
अंशुमनच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, चित्रपटसृष्टीत येण्याआधी त्याने अनेक नाटकांमध्ये काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याने मराठीत ‘श्वास’, ‘पोस्टर बॉईज’, ‘स्वराज्य’, ‘विठ्ठला शप्पथ’ अशा अनेक मराठी चित्रपटात उत्तम भूमिका साकारली आहे. ‘मोर्चा’ या चित्रपटातून त्याने गायन क्षेत्रात देखील प्रवेश केला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-