Monday, June 24, 2024

हे तर पाहिलंच पाहिजे! ‘शाळा’ फेम अभिनेत्री केतकी माटेगावकरचा लहानपणीचा ‘छडी लागे छमछम’ गाणं गातानाचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीत आतापर्यंत एकापेक्षा एक अशा चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. यातील बऱ्याच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. यासोबतच यातील कलाकारांनीही आपले विशेष स्थान निर्माण केले. अशाच चित्रपटांमध्ये सन 2012 साली प्रदर्शित झालेल्या ‘शाळा’ या चित्रपटाचा समावेश होतो आणि याच शाळा चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवला तो सोज्वळ, सालस आणि सुंदर अभिनेत्री केतकी माटेगावकरने. केतकी अभिनेत्रीसोबतच एक गोड गायिकाही आहे. ती सध्या सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांशी जोडलेली असते. अशातच आता तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याने सर्वांनाच भुरळ पाडली आहे.

केतकीच्या फॅन पेजने शेअर केलेल्या या व्हिडिओत ती ‘छडी लागे छम छम’ हे गाणे गाताना दिसत आहे. विशेष म्हणजे या गाण्यात चिमुकली केतकी आपल्याला पाहायला मिळत आहे. हे गाणे तिच्या चाहत्यांना भलतेच आवडल्याचे दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. केतकीच्या या व्हिडिओला 13 हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

चाहते तिच्या या व्हिडिओवर कमेंट करत ती खूप गोड दिसत असल्याचे म्हणत आहेत.

‘या’ चित्रपटांसाठी दिला आवाज
केतकीने अनेक चित्रपट आणि मालिकेसाठी आवाज दिला आहे. त्यामध्ये ‘बाल गणेश’, ‘तानी’, ‘टाईमपास 2’, ‘वाय झेड’ आणि ‘फोटोकॉपी’, ‘प्रेम हे’, ‘आनंदी गोपाळ’ आणि ‘पांघरून’ यांचा समावेश आहे.

‘या’ चित्रपटांमध्ये केले काम
मराठमोळ्या केतकीने एकापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने ‘काकस्पर्श’ (2012), ‘आरोही गोष्ट तिघांची’ (2012), ‘तानी’ (2013), ‘टाईमपास’ (2014), ‘टाईमपास २’ (2015) आणि ‘फुंतरू’ (2016) या चित्रपटामध्ये झळकली आहे. तिने ‘तानी’ या चित्रपटामुळे सर्वांच्या मनात आपली जागा बनवली.(actress and singer ketaki mategaonkar shares her childhood video while singing)

हे देखील वाचा