Friday, July 5, 2024

‘हा’ अभिनेता म्हणतोय, ‘ठाण्यात शिवसेना फक्त एकनाथ शिंदेंमुळे’

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. सत्तेत असलेल्या शिवसेना आमदारांनीच बंड केल्याने महाविकास आघाडीसमोरच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. बंड करणाऱ्यांमध्ये शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे नाव आघाडीवर आहे त्यामुळे त्यांच्यावर सध्या चौफेर टिका होताना दिसत आहे. या वादात आता मराठी सिनेजगतातील कलाकारांनीही उडी घेतल्याचे दिसत  आहे कारण अभिनेता आरोह वेलणकरने (Aroh Welankar) एकनाथ शिंदेना पाठिंबा देत शिवसेनेलाच खडेबोल सुणावले आहेत. 

सध्या महाराष्ट्रभर एकनाथ शिंदे हे नाव चांगलेच गाजताना दिसत आहे. कारण एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली बंड करत महाविकास आघाडीला गोत्यात आणले आहे. त्यामुळे अनेकजण एकनाथ शिंदेवर जोरदार टिका करताना दिसत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही एकनाथ शिंदेवर टिका करताना त्यांच्यासाठी पक्षाने खूप काही केले आहे तरीही त्यांनी अशाप्रकारे बंडखोरी केली म्हणत जोरदार टिका केली होती. त्यांच्या याच प्रतिक्रियेला अभिनेता  आरोह वेलणकरने प्रतिक्रिया दिली आहे.

एका मुलाखतीत बोलताना आरोहने ही प्रतिक्रिया दिली आहे ज्यामध्ये “शिवसेनेने एकनाथ शिंदेना मोठे केले, तसे शिंदेनेही सेनेसाठी भरपुर काही केले आहे. शिवसेनेला याची जाणीव असायला हवी.ठाण्यात शिवसेना केवळ शिंदेमुळेच आहे. शिंदेनी सेनेला भरभरुन दिले,” असे म्हणत आरोहने एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ वक्तव्य केले आहे. सध्या आरोहच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. आरोहच्या या प्रतिक्रियेमुळे आता मराठी कलाकारांनीही राजकारणाच्या वादात उडी घेतल्याचे दिसत आहे. दरम्यान अभिनेता आरोह वेलणकर हा मराठी सिने जगतातील एक लोकप्रिय कलाकार म्हणून ओळखला जातो. आरोहने अनेक गाजलेल्या मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.

आपल्या अभिनयाइतकाच आरोह सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असतो. ज्यावरुन तो अनेक विषयांवर आपले मत मांडताना दिसत असतो. परंतु बऱ्याचदा अशा व्यक्तव्यांमुळे त्याला ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा