Friday, November 22, 2024
Home मराठी Maharashtra Bhushan Award: महाराष्ट्रातील प्रेक्षक हा खडूस…; ‘महाराष्ट्र भूषण’ स्वीकारताना अशोक सराफ असं का म्हणाले?

Maharashtra Bhushan Award: महाराष्ट्रातील प्रेक्षक हा खडूस…; ‘महाराष्ट्र भूषण’ स्वीकारताना अशोक सराफ असं का म्हणाले?

रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Actor Ashok Saraf)  यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार(Maharashtra Bhushan Award) प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्विकारताना अशोक सराफ यांनी महाराष्ट्रातील प्रेक्षकांविषयीच्या भावना व्यक्त केल्या.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी खास उपस्थिती लावली होती.

काय म्हणाले अशोक सराफ?
पुरस्कार स्विकारल्यानंतर अशोक सराफ(Actor Ashok Saraf) यांनी आपलं मत व्यक्त केलं. ‘महाराष्ट्रातील प्रेक्षक कोणाला डोक्यावर उचलून घेतील आणि कोणाला आपटतील हे सांगता येणार नाही. त्यांच्यासमोर अभिनय करणं म्हणजे तारेवरची कसरत आहे. हा प्रेक्षक चोखंदळ, बुद्धिमान आणि तेवढाच खडूस आहे, ‘असं मत अशोक सराफ यांनी यावेळी व्यक्त केलं.

महाराष्ट्र भूषण पुरस्काराची यापूर्वीची यादी फार मोठ्या माणसांची आहे, या यादीत मला आज राज्य शासनाने नेऊन ठेवलंय, त्याबद्दल मी ऋणी आहे, असंही अशोक सराफ यावेळी म्हणाले.

गुरुवारी २२ फेब्रुवारी ला महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ (Maharashtra Bhushan Award) ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना तर मानाचा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात आला आहे. मुंबईतील वरळी येथे पार पडलेल्या ५७ व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

‘अशी ही बनवाबनवी’, ‘धूमधडाका’, ‘आम्ही सातपुते’ ते नुकताच प्रदर्शित झालेला ‘वेड’ अशा असंख्य गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

सावंतांच्या घरी खास व्याही भोजन; पुजा अन् सिद्धेश लवकरच अडकणार विवाह बंधनात

पंतप्रधान मोदींनी रकुल आणि जॅकी यांना दिल्या लग्नासाठी शुभेच्छा, सोशल मीडियावर कार्ड व्हायरल

author avatar
tdadmin

हे देखील वाचा