मराठी मनोरंजनसृष्टी लग्नसोहळ्याचा धुमधडका पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच लोकप्रिय अभिनेत्री पुजा सांवत(pooja sawant)हिचा साखरपुडा पार पडला. तर आता लग्नसोहळ्याला सुरुवात झालीय. पूजाच्या घरी नुकताच व्याही भोजन व मानपानाचा कार्यक्रम पार पडला आहे. त्याचे काही गोड क्षण पुजाने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
पूजा सावंत (pooja sawant )आणि सिद्धेश चव्हाण (siddhesh chavan) यांचा साखरपुडा १६ फेब्रुवारीला थाटामाटात पार पडला. या जोडप्याच्या साखरपुड्याला जवळचे कुटुंबीय, मित्रमंडळी आणि मनोरंजन विश्वातील कलाकारांनी खास उपस्थिती लावली होती. येत्या काही दिवसात दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत.
दरम्यान लग्नाआधीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. नुकतंच पुजाने आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले. त्या फोटोवरुन पुजाच्या घरी व्याही भोजनाचं आयोजन करण्यात आल्याचं पाहायला मिळालं.
यावेळी पूजा (pooja sawant ) पारंपरिक लूकमध्ये दिसली. जांभळ्या रंगाची साडी, केस मोकळे सोडलेले, गळ्यात शोभेल असा दागिना या लुकमध्ये पुजा खुपच सुंदर दिसत होती. तर सिद्धेशने गोल्डन कलरचा कुडता परिधान केला होता.
पूजाच्या (pooja sawant )होणाऱ्या दीराचं नाव आशिष चव्हाण असून तिच्या जाऊबाईचं नाव डायना डिक्रुझ असं आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्याहीभोजनाच्या फोटोंमध्ये तिच्या सासू-सासऱ्यांची देखील झलक पाहायला मिळत आहे.
यावेळी पूजाच्या आईने तिच्या सासूबाईंची आणि जावेची परंपरेनुसार ओटी भरली. या सोहळ्यातील गोड क्षणांचे फोटो पुजाने आपल्या इंस्टावर शेअर केले आहेत.
दोघांच्या लग्नाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. तर पुजाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, नुकतीच ‘मुसाफिरा’ चित्रपटात व एका बॉलीवूड गाण्यात झळकली होती. तर सिद्धेश कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो.
राहुल गांधींना बिग बींचे सडेतोड उत्तर?, ‘त्या’ विधानानंतर अमिताभ यांची पोस्ट चर्चेत
Shaitaan Trailer Out: राक्षस घरी येणार अन्….’शैतान’चा ट्रेलर रिलीज