छाेट्या पडद्यावरील कलर्स मराठी वाहिनीवर ‘जीव माझा गुंतला‘ ही लाेकप्रिय मालिका कायमच चर्चेत असते. या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारुन अभिनेता देवदत्त नागे याने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले. अशातच देवदत्तबाबत एक माेठी बातमी समाेर येत आहे. या मीलिकेच्या शूटिंगदरम्यान देवदत्तला दुखापत झाली. झालेल्या अपघाताची माहिती अभिनेत्याने स्वत: साेशल मीडियावरून चाहत्यांना दिली. ही बातमी समाेर येताच अभिनेत्याच्या चाहत्यांनी त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतून देवदत्त नागे (devdatta nage) पुन्हा एकदा छाेट्या पडद्यायवर दिसला. या मालिकेत अभिनेत्याची नकारात्मक भूमिका आहे. मालिकेचं शूटिंग करत असताना अभिनेत्याला दुखापत झाली. याची माहिती खुद्द अभिनेत्यानं त्याच्या अधिकृत इन्सास्टाेरीवर चाहत्यांना दिली. शेअर केलेल्या फाेटाेमध्ये अभिनेत्याच्या डाेळ्याच्या खालच्या बाजूला दुखापत झाल्याचं दिसत आहे.
या अपघातातून देवदत्त थाेडक्यात बचावल असला तरी काही दिवस डाॅक्टरांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे अभिनेता काही दिवस मालिकेतून विश्रांती घेणार आहे.

हे फोटो शेअर करत देवदत्तने लिहिलं की, “आता काही दिवसांसाठी विश्रांती. ‘जीव माझा गुंतला’ मालिकेच्या शूटिंगदरम्यान छोटी दुखापत झाली. देवाच्या कृपेनं थोडक्यात डोळा वाचला.” अभिनेत्याच्या डोळ्याच्या खालच्या बाजूला दुखापत झाली आहे. अभिनेत्याच्या या पोस्टमुळे आता काही दिवस तरी तो शूटिंग करणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
View this post on Instagram
अभिनेता देवदत्त नागे याच्याविषयी बाेलायचे झाले, तर त्याला ‘जय मल्हार’ या मालिकेतून लाेकप्रियता मिळाली. या मालिकेत त्यानं खंडेरायाची भूमिका साकारली होती. आजही प्रेक्षक अभिनेत्याला खंडेराय म्हणूनच ओळखतात. ही मालिका संपल्यानंतर देवदत्तनं काही सिनेमा आणि मालिकेत काम केलं. (marathi actor devdatta nage injured during shooting see photos)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अर्रर्र! ‘या’ अभिनेत्रीने उचलले मोठे पाऊल, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेला ठोकला रामराम
जरा इकडे पाहा! अभिषेकची नजर हटताच रणवीरनं घेतलं ऐश्वर्याचं चुंबन; अभिनेत्री हसत म्हणाली…










