टीव्हीवर झळकणाऱ्या काही जोड्या अशा असतात, ज्यांना पाहून चाहत्यांनाही वाटतं की, ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकत्र असावी. चाहत्यांचीही ही इच्छा आता पूर्ण झाली आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ ही प्रसिद्ध प्रसिद्ध मालिका संपली आहे. मात्र, यामध्ये राणादा आणि अंजलीबाई हे पात्र अजूनही चाहत्यांच्या मनात जिवंत आहे. ही जोडी खऱ्या आयुष्यात एक व्हावी अशी चाहत्यांची असलेली इच्छा या कलाकारांनी पूर्ण केली आहे. राणादाचे पात्र साकारणारा अभिनेता हार्दिक जोशी आणि अंजलीबाईंचे पात्र साकारणारी अभिनेत्री अक्षया देवधर यांनी काही दिवसांपूर्वीच साखरपुडा उरकला. आता त्यांचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
खरं तर हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि अक्षया देवधर (Akshaya Deodhar) हे सध्या लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत. मात्र, लग्नापूर्वीच त्यांच्यात भांडण झाल्याचे एका व्हिडिओत दिसत आहे. ‘लागिरं झालं जी’ (Lagira Zhala Jee) फेम अभिनेता नितीश चव्हाण (Nitish Chavan) याने हा व्हिडिओ त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
व्हिडिओत आहे तरी काय?
नितीश आणि हार्दिक आधी एकमेकांशी बोलत असतात. यावेळी अभिनेता हार्दिक नितीशला म्हणतो की, “मित्रा, पितळ घासून कधीही सोनं बनवलं जाऊ शकत नाही.” यानंतर नितीश त्याला म्हणतो की, “पण हे सर्व तू का बोलत आहेस.” यानंतर हार्दिक म्हणतो की, “हे यासाठी सांगतोय, कारण माझी पत्नी ब्युटी पार्लरमध्ये गेली आहे.” हार्दिकने असं म्हणताच तिथे अक्षयाची एन्ट्री होते. तिला पाहून अभिनेता नितीशही पळून जातो. त्यानंतर अक्षया हार्दिकची कॉलर पकडते. त्यांचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. चाहत्यांसोबतच कलाकारांकडूनही या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.
View this post on Instagram
या व्हिडिओवर २७ हजारांहून अधिक लाईक्सचा पाऊस पडला आहे. अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने कमेंटमध्ये हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. तसेच, एक चाहता म्हणतो की, “क्या बात है, मूड गार्डन गार्डन हो गया.” दुसऱ्या एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “अंजलीबाईंनी दोघांनाही हाणलं.”
हार्दिक आणि अक्षयाचा साखरपुडा
अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांनी याच वर्षी मागील महिन्यात म्हणजेच ३ मे, २०२२ रोजी साखरपुडा केला होता. त्यांच्या साखरपुड्यानंतर चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. आता हे दोघेही कधी लग्नबंधनात अडकतात याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘सैराट’ फेम सल्याला पुण्यात रिक्षावाल्याकडून मनस्ताप, फेसबूक पोस्ट करत वाचला तक्रारीचा पाढा
‘वाणीला ढाल बनवत रणबीर स्वत:ची करतोय सुटका, की दुसरं काही?’, व्हिडिओ पाहून चाहत्यांचा प्रश्न
कपड्यांवरुन ट्रोल केल्यावर मलायका अरोराने दिले सडेतोड उत्तर; म्हणाली…