Saturday, July 6, 2024

‘चालतंय की’, म्हणत संपूर्ण महाराष्ट्राला ‘राणा दा’ देणाऱ्या हार्दिकने बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केले होते काम

या मनोरंजनविश्वात काम मिळवणे आणि प्रसिद्ध होणे हे अजिबात सोपे नाहीये. प्रचंड मेहनत, चिकाटी आणि मिळेल ते काम करण्याची तयारी असलेली व्यक्तीच इथे टिकते आणि यशस्वी होते. आज नावारूपास आलेले अनेक कलाकार त्यांच्या संघर्षाच्या काळात इंडस्ट्रीमध्ये काम मिळवण्यासाठी अनेक लहानसहान भूमिका करतात, कलाकारांच्या मागे बॅकग्राउंड डान्सर म्हणूनही दिसतात. असे फक्त बॉलिवूड कलाकारच करतात हा खूप लोकांचा भ्रम असतो. मात्र आपल्या मराठी मनोरंजनविश्वात काम करणारे अनेक कलाकार देखील असेच पुढे येतात. आजच्या मराठी विश्वातील आघाडीचा अभिनेता असलेला आणि मालिकांमध्ये सतत हिट होणार अभिनेता म्हणजे हार्दिक जोशी. सगळ्यांचाच लाडका ‘राणादा.’ ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून नावारूपास आलेल्या हार्दिकने त्याच्या अभिनयाने आणि त्याच्या व्यक्तिमत्वाने सर्वांनाच भुरळ घातली. आज (६ ऑक्टोबर) हार्दिक त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याबद्दल अधिक माहिती.

हार्दिकचा जन्म ६ ऑक्टोबर १९८८ साली पुण्यात झाला. हार्दिकने २००९ साली मुंबईतील गुरुनानक खालसा कॉलेज आर्ट्समधून हार्दिकने त्याचे शिक्षण पूर्ण केले. त्या लहानपणापासूनच अभिनयाची खूप आवड होती. शाळा कॉलेजमध्ये तो नेहमीच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यायचा. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने अभिनयाचे क्षेत्र करिअर म्हणून निवडले आणि तो मुंबईत आला. सुरुवातीच्या काळात त्याने २०१२ साली स्टार प्रवाहाच्या ‘स्वप्नांच्या पलीकडले’ मालिकेत एक छोटीशी भूमिका केली. मात्र त्या भूमिकेने त्याला जास्त फायदा झाला नाही. पुढे तो अशा अनेक लहान भूमिकांमध्ये दिसला. त्याने मकरंद अनासपुरे यांच्यासोबत ‘रंगा पतंगा’ या चित्रपटात ‘एसीपी पाठक’ची भूमिका साकारली होती.

हार्दिकने अजय देवगणच्या ‘सन ऑफ सरदार’ ह्या सिनेमाच्या टायटल सॉन्गमध्ये ब्रॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले आहे. कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्याकडून त्याने शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले आहे. त्याला खरंतर हिंदी चित्रपट मालिकांमध्ये काम करायचे होते. हिंदी सिनेमा आणि मालिकांमध्ये चांगल्या संधीच्या तो शोधात होता. मात्र त्याला यश नाही मिळाले. मनासारख्या भूमिका मिळत नसल्यामुळे हार्दिक मराठी मालिकांकडे वळला. हार्दिकने ‘अस्मिता’, ‘राधा ही बावरी’, ‘दुर्वा’ यासारख्या मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे.तसंच इतकंच नाही तर त्याने‘क्राईम पेट्रोल’ या कार्यक्रमातही छोटेखानी भूमिका केली आहे.

हार्दिक हा मोरया ढोलताशा पथकाचा सक्रिय सदस्य असून, तो त्यांच्यासाठी कार्यक्रम करत असतो. हार्दिकला बाईक्सचीही आवड असून त्याचे सोशल मीडियावर बाईकसोबत अनेक फोटो शेअर करत आहेत. हार्दिक त्याच्या जबरदस्त फिटनेससाठी देखील ओळखलं जातो. व त्याचा फिटनेस कसा मेंटेन करतो याबद्दल त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, “मी शूटिंग संपल्यानंतर नियमितपणे जिमला जातो. मी वर्कआऊट करताना एकाच अवयवावर लक्ष केंद्रित न करता संपूर्ण शरीराचा व्यायाम करतो. चपळपणासाठी मी योगाला प्राधान्य देतो. मी माझ्या डाएटवर देखील खूप लक्ष देतो.”

काही महिन्यांपूर्वी हार्दिकने त्याचा एक व्ययसाय सुरू केला आहे. ‘कोल्हापूर बदाम थंडाई’ असं त्याच्या ब्रॅण्डचं नाव आहे. सोशल मीडियावर त्याने या व्यवसायाची माहिती देताना लिहिले की, “आजवर तुम्ही माझ्यावर व माझ्या कामावर खूप प्रेम केलं, आता मी व्यवसायात पदार्पण करत आहे. या पुढेही आपला असाच पाठिंबा कायम माझा सोबत राहील हा मला विश्वास आहे… कोल्हापूर बदाम थंडाई, आपल्या सेवेत… मग काय येणार नव्ह ? यायला लागतंय… चालतय की या सायंकाळी ४ नंतर खाऊ गल्ली खासबाग मैदान कोल्हापूर”

सध्या हार्दिक झी मराठीच्या ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. भविष्यात त्याला ऍक्शन सिनेमे करायला आवडतील. त्याला सलमान आणि जॉन अब्राहमसोबत काम करायचे आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूडला ‘राम राम’ ठोकल्यानंतर, ‘दंगल गर्ल’ झायरा वसीमने प्रथमच शेअर केला तिचा फोटो

-शूटिंगच्या पहिल्याच दिवशी संजय मिश्रा यांनी दिले होते २८ टेक, अखेर कंटाळून दिग्दर्शकाने केलं ‘हे’ काम

-‘कसं काय पावनं बरं हाय का?’ मृण्मयीने शेअर केला आदिनाथसोबतचा दिलखेचक फोटो

हे देखील वाचा