चित्रपटसृष्टीतून मागील काही दिवसापासून अनेक दुःखद घटना येत आहेत. अशातच मराठी चित्रपटसृष्टीतून एक दुःखद घटना समोर येत आहे. ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटातील ‘बाबू कालिया’ म्हणजेच जेष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन (pradeep patwardhan) यांचे निधन झाले आहे. हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. या बातमीने चित्रपटसृष्टीत दुःखाची झळ पसरली आहे. कलाकार देखील या शोक व्यक्त करत आहेत. मंगळवारी ९ ऑगस्ट रोजी मुंबईतही राहत्या घरी त्यांचे निधन झाले झाल्याची माहिती समोर आली आहे.
त्यांनी अनेक चित्रपटात काम करून नाव मिळवले आहे. ‘मोरूची मावशी’ हे त्यांचे गाजलेले नाटक आहे. मोरूची मावशी या नाटकातील त्यांची भूमिका फार गाजली. त्यांनी ‘नवरा माझा नवसाचा’, ‘लावू का लाथ’ अशा चित्रपटांमध्येही भूमिका साकारली होती.
प्रदीप पटवर्धन यांनी ‘एक फुल चार हाफ’ (१९५२) ‘डान्स पार्टी’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘एक शोष बहार गोळाबेरीज’, ‘बॉम्बे वेल्वेट’, ‘पोलीस लाईन’, ‘वन टू थ्री फोर’, ‘जर्नी प्रेमाची, परिस’, ‘थँक यू विठ्ठला’ अशा अनेक चित्रपटातून भूमिका साकारली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रख्यात मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन, कलाविश्वावर शोककाळा | Pradeep Patwardhan
असे काय झाले की, तापसी पन्नूला थेट मीडियासमोर जोडावे लागले हात; व्हिडिओ व्हायरल
‘त्यांनी माझं मुस्काड फोडलं…’, पाकिस्तानी अभिनेत्रीने उघडे पाडले महेश भट्ट यांचे पितळ