Saturday, April 20, 2024

असे काय झाले की, तापसी पन्नूला थेट मीडियासमोर जोडावे लागले हात; व्हिडिओ व्हायरल

अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) तिच्या अभिनया इतकीच तिच्या वादग्रस्त वक्तव्याने जास्त चर्चेत असते. अशातच तिचा आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये ती आणि पॅपराझीसोबत वाद घालताना दिसत आहेत. ही घटना सोमवारी (८ ऑगस्ट) संध्याकाळी घडली. जेव्हा तापसी तिच्या आगामी ‘दोबारा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईतील मिठीबाई कॉलेजमध्ये पोहोचली. एका फोटोग्राफरने तिला कार्यक्रमासाठी उशीर झाल्याचे सांगितल्याने वाद झाला. जेव्हा तापसी कार्यक्रमस्थळी पोहोचली तेव्हा फोटोग्राफर तिला फोटोसाठी थांबायला सांगत असताना तिला लगेच आत नेण्यात आले.

एका फोटोग्राफरने तापसी पन्नूला सांगितले की, खूप उशीर झाला आहे आणि ते दोन तास तिची वाट पाहत आहेत. पॅपराझींनीही तापसीकडे न थांबण्याची तक्रार केली. पॅपराझींनी तिला सांगितले की, “आम्ही तुझ्यासाठीच राहत आहोत.” यावर तापसीने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. तापसी म्हणाली, “मला जे सांगितले होते तेच मी करत आहे, तू माझ्यावर का ओरडत आहेस.”

यावर पॅपराझींनी तापसी पन्नूला सांगितले की, तेही तिची वाट पाहत आहेत. तापसी पॅपाराझींना म्हणाली, “कृपया माझ्याशी आदराने बोला, मी फक्त माझे काम करत आहे. मला सांगितलेल्या ठिकाणी मी वेळेवर पोहोचलो. तू माझ्याशी आदराने बोलशील, मीही तुझ्याशी आदराने बोलेन.”

तिचा हा व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होत आहे, आणि ती अशाप्रकारे त्यांच्याशी बोलली म्हणून तिला ट्रोल देखील केले जात आहे. तसेच काहींना मात्र तिचे हे बिनधास्त वागणे आवडले आहे. ती सध्या तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूप बिझी आहे. काही दिवसांपूर्वी तिने कपिल शर्मा शोमध्ये जाण्यास नकार दिला यावर तिने तिचे मत व्यक्त केले होते. तिने सांगितले होते की, “माझी सेक्स लाईफ इतकी इंटरेस्टिंग नाहीये.” त्यामुळे देखील ती चर्चेत आली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

छोट्या कपड्यांमुळे नेटकऱ्यांनी केला दिशा पटानीचा बाजार; म्हणाले, ‘आली बघा दुसरी उर्फी जावेद’

‘त्यांनी माझं मुस्काड फोडलं…’, पाकिस्तानी अभिनेत्रीने उघडे पाडले महेश भट्ट यांचे पितळ

प्रियांकाचा आतापर्यंतचा सगळ्यात बोल्ड व्हिडिओ होतोय व्हायरल, बाथरूममध्ये करत होती ‘हे’ काम

 

हे देखील वाचा