मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता असणारा प्रसाद ओक सतत काेणत्या ना काेणत्या कारणामुळे चर्चेत असतो. प्रसाद सध्याच्या घडीला इंडस्ट्रीमधील सर्वात जास्त व्यस्त अभिनेता आहे. एकीकडे अभिनय दुसरीकडे दिग्दर्शक अजून टेलिव्हिजन अशी तारेवरची कसरत अभिनेता करताना दिसतो. अशात एका कार्यक्रमात मंजिरी अन् प्रसाद ओकने साेबत उपस्थिती दर्शवली, ज्यादरम्यान मंजिरीने अभिनेत्याच्या पहिल्या प्रेमाचा खुलासा केला. काय म्हणाली अभिनेत्री? चला, जाणून घेऊया…
या मुलाखतीत मंजिरीने प्रसाद (prasad oak) आणि तिच्या नात्यावर खुलासा केला. मंजरी म्हणाली, “आमचं जरी लव्ह मॅरेज असलं तरी मी त्याच पहिले प्रेम नसल्याच त्यांना मला सांगितलं हाेत. तसेच त्याच्या पहिलं प्रेमाची जागा त्याच्या आयुष्यात काेणीही घेऊ शकत नाही हे देखील त्याने मला ठामपणे सांगितलं हाेतं.”
मंजिरी पुढे म्हणाली, “प्रसादने मला ज्यावेळी प्रपाेज केलं, तेव्हा त्याने मला तीन गाेष्टी सांगितल्या हाेत्या. पहिली गाेष्ट त्याने सांगितली हाेती की, मला मस्करा लावता येत नाही. दुसरी अशी की, मला बाबू-शाेना असं प्रेमान बाेलता येत नाही आणि तिसरी आणि महत्वाची गाेष्ट म्हणजे, माझे क्षेत्र, ज्याचा मला अभिनमान आहे. त्यामुळे माझ पहिले प्रेम माझ प्राेफेशन राहिल. म्हणून तु पहिलेच मनाची तयारी कर असं प्रसादने मला सांगितलं हाेतं. मात्र, वयाच्या 16व्या वर्षी मी काय मनाची तयारी करणार असं म्हणत मंजिरीने प्रसादच्या पहिल्या प्रेमाचा खुलासा केला.
View this post on Instagram
प्रसाद ओकच्या अभिनय काराकिर्द विषयी बाेलायचे झाले, तर त्याने ‘हिरकणी’, ‘चंद्रमुखी’, ‘धर्मवीर’, ‘क्षण’, ‘धुरळा’ यासारख्या दमदार चित्रपटात काम करून आपल्या अभिनयाची छाप साेडली आहे.(marathi actor prasad oaks first love)
अधिक वाचा –
– धक्कादायक बातमी! फॅशन शो दरम्यान लोखंडी खांब अंगावर पडला, 24 वर्षीय मॉडेलचा जागीच मृत्यू
–‘गंदी बात’ फेम अभिनेत्री अडकली लग्न बंधनात? इस्लाम धर्म स्वीकारून ‘या’ अभिनेत्यासाेबत बांधली सात जन्माची गाठ