Friday, December 8, 2023

धक्कादायक बातमी! फॅशन शो दरम्यान लोखंडी खांब अंगावर पडला, 24 वर्षीय मॉडेलचा जागीच मृत्यू

कलाविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दिल्ली जवळील नोएडा शहरात एका फॅशन शो दरम्यान दुर्दैवी अपघात घडला आहे. लोखंडी खांब अंगावर पडल्याने एका 24 वर्षीय मॉडेलचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

नोएडातील सेक्टर-16ए पोलीस स्टेशन हद्दीतील फिल्मसिटीमध्ये असलेल्या लक्ष्मी स्टुडिओमध्ये हा फॅशन शो सुरु होता. वंशिका चोप्रा (वय 24 वर्ष, रा. दिव्यांश फ्लोरा, गौर सिटी-2) असे मृत पावलेल्या सदर मॉडेलचे नाव आहे. तर, या दुर्घटनेत आणखीन एक तरुण जखमी झाला आहे. ( model dies after lighting truss collapses during fashion show in film city at noida )

धक्कादायक माहिती म्हणजे, या फॅशन शोला कोणतीही परवानगी देण्यात आली नव्हती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी कारवाई करत फॅशन शोच्या आयोजकांसह चार जणांना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (11 जून) दुपारी दीड वाजताच्या सुमारास हा फॅशन शोचा कार्यक्रम सुरु होता. यावेळी लायटिंगसाठी उभारलेला लोखंडी खांब स्टेजवर उभ्या असलेल्या मॉडेलच्या अंगावर पडला, यात तिचा जागीच मृत्यू झाला. तर एक तरुण गंभीर जखमी झाला झाला. पुढील तपास पोलिस करत आहेत.

अधिक वाचा –
– डान्सर प्रभुदेवा चौथ्यांदा बनला बाबा! पत्नी हिमानीने दिला चिमुकल्या परीला जन्म, कोरिओग्राफरला याआधी 3 मुले
– मोठी बातमी! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या कारचा भीषण अपघात, पाहा व्हिडिओ

हे देखील वाचा