Saturday, July 6, 2024

रितेश देशमुखचा धाय मोकलून रडतानाचा व्हिडिओ व्हायरल, अभिनेत्याची अवस्था पाहून चाहते चिंतेत

सन २००३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘तुझे मेरी कसम’ हा सिनेमा तुम्हाला आठवतोय का? का नाही आठवणार. या सिनेमातूनच अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी बऱ्याच सिनेमात एकत्र काम केलं. हे जोडपं हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील सर्वात रोमँटिक जोडप्यांपैकी एक म्हणून ओळखलं जातं. विशेष म्हणजे, हे जोडपं त्यांच्या व्यावसायिक कामाव्यतिरिक्त सोशल मीडियावरील पोस्टमुळे जरा जास्तच चर्चेत असतात.

कधी मजा-मस्ती करतानाचे, कधी डान्स करतानाचे, तर कधी डायलॉगबाजी करतानाचे व्हिडिओ हे जोडपं शेअर करत असतं. त्यांच्या चाहत्यांना त्यांचा हा अंदाज खूप जास्त आवडतो. त्यामुळेच त्यांचे कोणतीही पोस्ट शेअर होता क्षणीच व्हायरल होते. मात्र, यावेळी रितेशचा जरा वेगळाच व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो चक्क रडताना दिसत आहे. रितेशला (Riteish Deshmukh) रडताना पाहून त्याचे चाहतेही चिंतेत पडले आहेत.

पण चिंता करण्याची गरज नाही. खरं तर, मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा डंका वाजवणाऱ्या रितेशची पत्नी जिनिलियाने (Genelia Deshmukh) तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत जिनिलिया आणि रितेश रडण्याचं नाटक करताना दिसत आहेत. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला ‘हमारी अधुरी कहाणी’ हे गाणं वाजत असतं आणि हे जोडपं पडत असतं. मात्र, थोडा वेळ हे गाणं मध्येच थांबतं. यावेळी तसाच रडणाऱ्या रितेशला जिनिलिया गाणं थांबल्याची आठवण करून देते. त्यानंतर रितेश गाणं लावतो आणि पुन्हा रडायला सुरू करतो. त्यांचा हा व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे.

जिनिलियाने हा व्हिडिओ शेअर करत “पार्टनर्स इन क्राईम फॉरएव्हर,” अशा आशयाचं कॅप्शन दिलं आहे. या जोडप्याचा हा व्हिडिओ आतापर्यंत २९ लाख युजर्सनी पाहिला आहे. तसेच या व्हिडिओवर ४ लाखांहून अधिक लाईक्सचा पाऊसही पडला आहे. याव्यतिरिक्त १ हजारहून अधिक कमेंट्सही मिळाल्या आहेत.

एका युजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, “तुम्ही दोघे खूप भारी आहात.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक.” आणखी एका युजरने लिहिले की, “इथपर्यंत फील होतंय दादा दर्द.” याव्यतिरिक्त त्यांचे चाहते या व्हिडिओवर हसण्याच्या इमोजीचाही पाऊस पाडत आहेत.

रितेश आणि जिनिलिया यांनी ‘तुझे मेरी कसम’ या सिनेमानंतर ‘मस्ती’, ‘तेरे नाल लव्ह हो गया’, ‘लय भारी’ यांसारख्या सिनेमात काम केलंय.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही  वाचा-

हे देखील वाचा