Saturday, June 29, 2024

वाथी कमिंग! भन्नाट डान्स करत अभिनेता संदिप पाठकने समाजाला दिला मोलाचा सल्ला

संपूर्ण महाराष्ट्रात सध्या लॉकडाऊन असल्याने समाजातील इतर गोष्टी प्रमाणेच चित्रपट सृष्टीवर देखील या लॉकडाऊनचा चांगलाच परिणाम झाला आहे. अनेक चित्रपटांच्या आणि मालिकांच्या शूटिंग सध्या बंद आहे. तरीही हे कलाकार घर बसल्या का होईना पण प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. हे कलाकार त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून मनोरंजन करत आहे. यातच मराठीत चित्रपटसृष्टीतील मुख्यतः विनोदी भूमिका निभावलेला अभिनेता संदीप पाठक. याने देखील एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ बघताना कदाचित मजेशीर वाटू शकतो, पण यातून तो खूप मोठा संदेश देत आहे.

संदीप पाठकने वाथी कमिंग या ट्रेंडींग गाण्यावर एक व्हिडिओ केला आहे,आणि तो त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, संदीप अनेक मुलांसोबत टेरेसवर वाथी कमिंग या गाण्यावर डान्स करत आहे. या डान्सची सुरुवातच ते मास्क घालून करतात. त्यानंतर संदीप बाकी मुलांना हातावर सॅनिटायझर देत आहे, तसेच त्याच्या हातावर देखील घेऊन हात स्वच्छ करत आहे. यांनतर सगळी मुले एका नंतर एक वाफ घेताना दिसत आहे. शेवटी हे सगळे हात जोडून या गोष्टी करा असे सांगत आहे.

हा व्हिडिओ शेअर करत संदीपने कॅप्शन दिले आहे की, “मी माझ्या सोसायटीमधील छोट्या मित्रांसोबत ही रील केली आहे. खरंतर त्यांच्या अभिनय क्षेत्राशी काहीच संबंध नसताना त्यांनी या रीलची शूटिंग खूप एन्जॉय केली. थॅंक्स फ्रेंड. सध्याच्या कोरोना काळात स्वतःची काळजी घ्या. एवढा संदेश देण्याचा छोटा प्रयत्न गोड मानून घ्या.”

कोरोनाच्या काळात स्वतःची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा असा संदेश तो या व्हिडिओ मधून देत आहे. या आधी अनेक कलाकारांनी या ट्रेंडींग गाण्यावर डान्स केला होता. पण संदीपने एक वेगळाच प्रयोग करून जनजागृती करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.

संदीपच्या कारकिर्दीत बोलायचे झाल्यास, त्याने अनेक मराठी चित्रपटात तसेच मालिकांमध्ये देखील काम केले आहे. त्याने ‘रंगा पतंगा’, ‘इडक: द गोट’, ‘एक हजाराची नोट’, ‘नटसम्राट’, ‘वन रूम किचन’, ‘पोस्टर गर्ल’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे.

हे देखील वाचा