Wednesday, March 12, 2025
Home मराठी ‘लोकमान्य टिळकांचे रत्नागिरीतील जन्मस्थळ काल्पनिक’, अभिनेते शरद पोंक्षे यांचा दावा

‘लोकमान्य टिळकांचे रत्नागिरीतील जन्मस्थळ काल्पनिक’, अभिनेते शरद पोंक्षे यांचा दावा

मराठी सिनेसृसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. आपल्या अभिनयाइतकेच ते त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी तसेच बिंनधास्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. विविध विषयांवर ते आपली  स्पष्ट मते मांडताना दिसत असतात. त्यांच्या या स्पष्टवक्तेपणामुळे बऱ्याचदा त्यांच्यावर टिकाही होताना दिसत असते. आता अलिकडेच त्यांनी लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थळाबद्दल वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, राष्ट्रपुरुष लोकमान्य टिळक यांचा जन्म दापोली तालुक्यातील चिखलगाव येथे झाला. मात्र रत्नागिरी शहरातील ज्या घरात लोकमान्य टिळकांचा जन्म झाला असे सांगण्यात येते ते ठिकाण काल्पनिक असल्याचा दावा सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांनी केला आहे. तालुक्यातील चिखलगाव येथील लोकसाधनेच्या 40 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यामुळे आता लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थळावरुन नवा वाद होण्याची शक्यता आहे.

दरम्यान शरद पोंक्षे यांची रोखठोक वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही त्यांनी अनेकदा आपले रोखठोक मत केले होते. अलिकडेच त्यांनी सावरकर नावाची दहशत निर्माण झाली पाहिजे असे वक्तव्य केले होते. यानंतर त्यांच्यावर चौफेर टिका झाली होती.

हे देखील वाचा