फोटोत दिसणाऱ्या ‘या’ गोड मुलीला ओळखले का? आज आख्खं बॉलिवूड आहे तिच्या अदांवर फिदा

बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत जे आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. सिनेसृष्टीतील हे स्टार्स सोशल मीडियावर अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. बॉलिवूडची एक दिग्गज अभिनेत्री सध्या इंटरनेटवर खूप चर्चेत आहे. खरंतर, एका बॉलिवूड अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अभिनेत्रीचा हा फोटो पाहून तिला ओळखणे जवळपास अशक्य आहे.

अलीकडेच एका चाहत्याने ट्वीटरवर एका मुलीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एक लहान मुलगी तिच्या आईच्या मांडीवर दिसत आहे. पण फोटो पाहता या चिमुरडीने सिनेसृष्टीतील अनेक बड्या कलाकारांसोबत काम केले आहे हे निश्चित करणे अशक्य आहे. एवढेच नाही तर आज ही अभिनेत्री सिनेसृष्टीतील प्रसिद्ध स्टार्सपैकी एक आहे. फोटोत दिसणारी ही मुलगी काल (३ ऑगस्ट) ६७ वर्षांची झाली आहे.

तुम्ही या मुलीला अजूनही ओळखले नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो कोण आहे ही अभिनेत्री. फोटोत दिसणारी ही चिमुरडी दुसरी कोणी नसून बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री रेखा (Rekha) आहे. फोटोमध्ये अभिनेत्री तिची आई अभिनेत्री पुष्पवल्ली यांच्या मांडीवर दिसत आहे. रेखा तिच्या अभिनयामुळेच नाही तर तिच्या सौंदर्यामुळेही खूप चर्चेत असते. या वयातही ही अभिनेत्री अनेक तरुण अभिनेत्रींशी स्पर्धा करते.

सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री असण्यासोबतच त्या राज्यसभेच्या खासदारही राहिल्या आहेत. आपल्या चित्रपट आणि अभिनयामुळे चर्चेत असलेली रेखा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. रिपोर्ट्सनुसार, रेखाच्या वडिलांनी तिच्या आईशी लग्न केले नाही. त्याचे वडील जैमिनी गणेशन यांचे लग्न झाले होते आणि त्यांचे आणखी तीन महिलांशी संबंध होते. रेखाला ७ बहिणी आणि १ भाऊ असून त्यापैकी रेखा आणि राधा या पुष्पवल्ली यांच्या मुली आहेत. रेखाचे खरे नाव भानुरेखा गणेशन असून तिने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

हेही वाचा-

सनी लिओनीचा बॉलिवूडमध्ये १० वर्ष पूर्ण, ‘त्या’ दिवसांबद्दल केला उघडपणे खुलासा

‘मी तुमच्यासोबत गाणार नाही’, लता दीदींच्या ‘त्या’ वाक्याने दुखावले होते किशोर कुमार

‘कोई मिल गया’ अभिनेत्याचे निधन, राहत्या घरीच मालवली प्राणज्योत

 

Latest Post