Wednesday, June 26, 2024

“शेवटी तुम्हा आम्हाला काय हवं ??” मराठी अभिनेत्यांच्या राजकारणावरील ‘त्या’ पोस्टने उंचावल्या लोकांच्या भुवया

सध्या महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक दुर्घटना देखील घडताना दिसत आहे. अशातच सरकारी यंत्रणा आणि मंत्री देखील या दुर्घटनांचा आढावा घेत राज्याचा कारभार देखील सांभाळत आहे. नुकतेच इरसाळवाडी या गावावर दरड कोसळून संपूर्ण गाव दबल्या गेले. या घटनेसोबतच इतरही काही महत्वाच्या घडामोडी राज्यात घडल्या त्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी कशा हाताळल्या याचे मराठी अभिनेत्याने कौतुक केले आहे. अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय आहे.

संकर्षण नेहमीच या माध्यमातून विविध गोष्टींबद्दल त्याचे मत, भावना मांडत असतो. मात्र राजकारणावर अजून तसे त्याने काही जास्त भाष्य केलेले नाही. अशातच त्याचे एक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे. संकर्षणने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “मी कधीही राजकीय नेत्यांवर भाष्यं करत नाही. त्या संदर्भात पोस्ट तर करतच नाही. कारण तो माझा प्रांत नाही. मला त्यातलं ज्ञान नाही. पण, आज सोशल मीडियावर तीन वेगवेगळ्या पोस्ट पाहिल्या आणि खरंच छान वाटलं.
१) घटनास्थळी धावलेले , पुनर्वसनाचे आश्वासन देणारे ‘मुख्यमंत्री’
२) त्यांच दुर्दैवी घटनांचा आढावा घेणारे , नियोजन पाहाणारे ‘उपमुख्यमंत्री’
आणि
३) ‘वंदे मातरम्’ विषयी संयममाने , योग्य शब्दात समज देणारे ‘उपमुख्यमंत्री’..

तिघेही वेगळ्या पक्षाचे …पण बरं वाटलं की ; एकाच वेळी आमचं रक्षण, नियोजन आणि स्वाभिमान तिन्ही गोष्टिंविषयी तळमळीने कुणीतरी काम करतंय . शेवटी तुम्हा आम्हाला काय हवं ?? तेच ना..! खरं सांगू ? आम्हाला तुम्ही सगळेच आवडता हो .”

त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत त्यांची मत मांडली आहेत. दरम्यान संकर्षण सध्या ‘तू म्हणशील तसं’ आणि ‘नियम व अटी लागू’ या दोन नाटकांमध्ये दिसत असून, तो टीव्हीवाट ‘किचन क्वीन’ शोचे सूत्रसंचालन करताना देखील दिसत आहे.

अधिक वाचा- 
‘डोकं सुन्न झालंय,सगळे सुखरुप असुदेत…’; इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
मणिपूरच्या ‘त्या’ घटनेवर अनुपम खेर भडकले; पोस्ट करत म्हणाले,’लज्जास्पद…’

हे देखील वाचा