Monday, September 25, 2023

‘डोकं सुन्न झालंय,सगळे सुखरुप असुदेत…’; इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल

प्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरी हिने अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. ‘पुढचं पाऊल’ मालिकेत काम करून तिने चाहत्यांना तिच्या अभिनयाची झलक दाखवली आहे. अगदी उत्तमरित्या आपली भूमिका तिने पडद्यावर मांडली आहे. सोज्वळ व्यक्तीमत्व कसे असावे, हे तिने तिच्या अभिनयातून दाखवून दिले आहे. जुईचे लाखो चाहते आहेत. जुई अभिनयासोबतच सामाजिक प्रश्नांवर देखील बोलताना दिसते.

जुई सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करत असते. तिच्या पोस्टवर चाहते लाइक आणि कमेंट करत असते. नुकतीच तिने एक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. रायगड येथील इर्शाळवाडीच्या येथे घरांवर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. यावर अभिनेत्री जुईने पोस्ट शेअर केली आहे.

जुईने पोस्ट शेअर करताना लिहिले की, “ईर्शाळगडावर गेले तेव्हाच्या काही आठवणी… सकाळपासुन ईर्शाळवाडीवर दरड कोसळल्याची बातमी बघतेय आणि डोकं सुन्नं झालय… तिथल्या आऊच्या हातचा स्वयंपाक अजुनही आठवतोय… एव्हढ्या ऊंचावर असलेली ठाकरवाडी… विज नाही.. मेडीकल, जिवनावश्यक वस्तु असं वरती ठकरवाडीत काहीच नाही.. तरीही सदैव चेहरा हसरा… कसं काय जमतं त्यांना? प्रत्येक वेळेला 1 ते 1.30 तास चढुनवर जाणं किती अवघड आहे… पण तरीही कसलीही तक्रार न करता खुप कष्टं करुन मानाने जगतात ही ठाकरं… माझ्या खुप जवळचा विषय आहे. ठाकरं आणि ठाकरवाड्या… कितीतरी वाड्यांवर मी फिरलिये… त्यांच्या हातचं चविष्ठं जेवलिये… बातमी बघुन खुप वाईट वाटलं… सगळे सुखरुप असुदेत..” जुईने केलेल्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केले आहेत.

दरम्यान, रायगड येथील इर्शाळगड येथे दरड कोसळला आहे. त्यामुळे अनेकजण बेपत्ता झाले आहेत. 19 जुलैच्या रात्री 11च्या सुमारास ही दरड कोसळल्याने एकच खळबळ उडाली आहे. चौक गावापासून 6 किमी डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात असलेल्या आदिवासीवाडीतील घरांवर दरड कोसळल्याने अनेक घरे खाली दबली गेली आहेत. तसेच यामध्ये 100हून अधिक लोक अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. इथे बचाव कार्य सुरू आहे. (Actress Jui Gadkari  post on Irshalwadi tragedy goes viral)

अधिक वाचा- 
मणिपूरच्या ‘त्या’ घटनेवर अनुपम खेर भडकले; पोस्ट करत म्हणाले,’लज्जास्पद…’
आमचे ठरले! स्वानंदी टिकेकरने होणाऱ्या नवऱ्याचा फोटो केला शेअर, नाव ऐकून नक्कीच बसेल आश्चर्याचा धक्का

हे देखील वाचा