Monday, July 1, 2024

“मुंबईतली एकही जागा मी सोडली नाही जिथे” मिलिंद गवळी त्यांनी त्यांच्या पोस्टमधून व्यक्त केली ‘त्या वेडाची’ गोष्ट

आपल्या सगळ्यांमध्ये नेहमीच कोणते ना कोणते वेड असते. प्रत्येकालाच त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा घेल्या गोष्टीबद्दल अधिकच लगाव असतो. असा काहीसा विचार केला तर सगळ्यांनाच खासकरून मुलांना त्यांच्या आयुष्यातील पहिल्या बाईकचे कमालीचे आकर्षण असते. आयुष्यात अनेक महागड्या बाईक, कार घेतील मात्र पहिली बाईक ती पहिली बाईक तिची जागा आणि आठवण कधीही कोणीही घेऊ शकत नाही. मागच्या पिढीतील लोकांबद्दल सांगायचे झाले तर, याबाबतीत त्यांची पिढी जरा जास्तच भावनिक होती. आठवणी कायम स्मरणात ठेवणे त्यांना चांगले जमते. अशातच एका अभिनेत्याने एक सुंदर पोस्ट त्यांच्या बाइकच्या आठवणींशी संबंधित सोशल मीडियावर शेअर केली आहे, जी कमालीची गाजत आहे.

मिलिंद गवळी हे आई कुठे काय करते या मालिकेच्या निमित्ताने घराघरात पोहचले आहे. मालिकेसोबतच त्याचे देखील प्रस्थ चांगलेच वाढले आहे. अभिनयसोबतच आपण पहिले तर मिलिंद उत्तम विचार करतात आणि त्यांना त्यांचे विचार शब्दात लिहिता देखील येतात. त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट पहिल्या तर आपल्या हे लक्षात येईलच. त्यांच्या पोस्ट कमालीची गाजत असतात. आता सुद्धा त्यांनी त्यांच्या गाडीच्या प्रेमाची आणि आठवणींची एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

मिलिंद यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, ““वेड

एखाद्या गोष्टीचं लहानपणापासून आपल्याला खूप वेड असतं आणि ते आपल्या मधलं वेड कधीही जात नाही,
मोटरसायकलचं माझं वेड तसंच आहे, आत्ता मोटरसायकल माझ्या काहीही उपयोगाची वस्तू राहिलेली नाही, तरीसुद्धा आपल्याकडे एखादी मोटरसायकल असावी अशी जबर इच्छा अजूनही मनामध्ये आहे, आणि ती इच्छा मी सतत अनेक वर्ष मारत असतो, मनाला लहान मुलासारखं समजून सांगत असतो की, आता हे वेड दे सोडून, पण “दिल है कि मानता नही” शाळेत असताना सायकलचा खूप वेड होतं, आई म्हणाली “मी तुला सायकल कधीही घेऊ देणार नाही ” कारण तू ती सायकल घेऊन रस्त्यावर जाशील, लहान मूल सायकल घेऊन रस्त्यावर जाणं म्हणजे त्या काळामध्ये खूपच dangerous होतं.

पण मी हट्टी होतो मी एक नाही तर दोन सायकली घेतल्या. मग काय मग कॉलेजमध्ये मोटर सायकल हवी आहे म्हणून हट्ट करायला लागलो, आई म्हणाली मी तुला कधीही मोटरसायकल घेऊन देणार नाही ते तर आणखीनच डेंजरस, आई नाहीच म्हणायची, बारावीत असताना मी दोन कोचिंग क्लासेस मध्ये जायचं, पोर्तुगीज चर्चला दयासरां चे क्लासेस असायचे, दादर स्टेशनला पिंगेज क्लासेस मध्ये जायचं, दया सरांचा क्लास संपला की तिकडूनं चालत चालत दादर स्टेशन ला जायचो, एकदा आई ने मला तसं घाईघाई चालत चालत जाताना पाहिलं आणि तिला खूप वाईट वाटलं, वडिलांना म्हणाली “माझं लेकरू रोज इतक्या लांब चालत क्लासेसला जातो, बिचाऱ्याला घेऊन द्या एखादी बाईक”, आणि मग त्यांनी मला रू १७,०००/- ची हिरो होंडा १०० cc bike . घेऊन दिली.

आणि मग माझ्या adventurous life ला सुरुवात झाली, तब्बल आठ वर्ष ती हिरो होंडा मुंबईच्या कानाकोपऱ्यात फिरवली, मुंबईतली अशी एकही जागा मी सोडली नाही जिथे ती बाईक मला घेऊन गेली नाही, मुंबईतली गल्ली बोळ मी त्या बाईकने फिरलो, ६० किलोमीटर एका लिटरला ती चालायची, ९.५० ते १० रूपये लिटर पेट्रोल होतं, त्या हिरो होंडाची माझी दोस्ती झाली होती, कधीही मी तिला पडू दिली नाही, खूप सावकाश आणि प्रेमाने चालवायचो, ती मी कोणालाही चालवायला द्यायचो नाही, दुसऱ्यांच्या बाईकची लोकांना कदर नसते.

मग ऍक्टर झाल्यावर चेहऱ्याची खूप काळजी घेण्यासाठी बाईक सोडली, त्या काळात ट्रक्स खूप काळा धूर सोडायचे, चेहरा पूर्ण काळा पडायचा, हेल्मेट मुळे केसांची स्टाईल खराब व्हायची, मग काय मग गाडी घेण्याचं वेड लागलं, पण bike चं वेड काही कमी होत नाही आहे. शेवटी वेडचं ते. काल धवलने त्याची bike मला चालवायला दिली. आणि पुन्हा ते मनात त्या ईच्छा निर्माण झाल्या”.

मिलिंद यांनी त्यांच्या या पोस्टमधून आता त्यांना बाईक चालवता येत नसल्यची सल देखील बोलून दाखवली आहे. त्यांच्या या पोस्टवर लोकांनी भरभरून कमेंट्स करत त्यांच्या बाईक प्रेमाचे आणि लिखाणाचे कौतुक केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

“मला चित्रपटात काम करायचे नव्हते तसे करायचे असते तर….” मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने केला होता करियरबद्दल खुलासा

आईच्या भूमिकेतील रीमा लागू यांचा दमदार अभिनय पाहून इनसिक्योर झाल्या होत्या श्रीदेवी, उचललं ‘हे’ मोठं पाऊल!

हे देखील वाचा