Saturday, June 29, 2024

फक्त मालिकेतच नाही, खऱ्या आयुष्यातही श्रेयसकडे आहे आलिशान गाड्यांचे कलेक्शन

अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) सध्या छोट्या पडद्यावर ‘तुझी माझी रेशीमगाठ’ मालिकेतून प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करताना दिसत आहे. मालिकेतील श्रेयसच्या दमदार अभिनयाचे तर कौतुक होतच आहे, मात्र त्याच्या खास जीवनशैलीचीही चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. आलिशान गाड्या, बंगला, आणि त्याची ऐशारामी जिवनशैली या सर्वांचेच चाहत्यांना भूरळ घातली आहे. मात्र हे फक्त पडद्यावरचं नाही. श्रेयसची खरीखुरी लाइफस्टाइलही अगदी तशीच आहे. मराठी चित्रपट जगतातील या दमदार अभिनेत्याकडे एकापेक्षा एक आलिशान गाड्यांचा ताफा आहे.

श्रेयस तळपदे हा मराठी चित्रपट जगतातील एक यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जातो. दमदार अभिनय आणि देखणा लूक यांमुळे त्याने चित्रपट जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या अभिनय कारकिर्दित श्रेयसने एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत त्यामुळे चित्रपट जगतातील एक यशस्वी अभिनेता म्हणून त्याचे नाव घेतले जाते. श्रेयस चित्रपटांप्रमाणेच त्याच्या गाड्यांच्या आवडीसाठीही विशेष प्रसिद्ध आहे. श्रेयसच्या ताफ्यात एकापेक्षा एक आलिशान आणि महागड्या गाड्यांचा समावेश आहे.

गाड्यांच्या कलेक्शनची विशेष आवड असलेल्या श्रेयसकडे मर्सिडिज बेन्झ इ क्लास ही महागडी कार आहे. ज्याची किंमत ९४ लाखांच्या घरात आहे. त्याचप्रमाणे त्याच्या ताफ्यात मर्सिडिज बेन्झ जीआयएस ही महागडी कार देखील असून, या कारची किंमत १.१६ कोटींच्या घरात आहे. मर्सिडिज शिवाय श्रेयसकडे ‘ऑडी Q7’ ही कार आहे. ज्याची किंमत ७० लाख एवढी आहे. श्रेयसच्या ताफ्यात ऑडी कंपनीच्याही अनेक आलिशान गाड्या आहेत. ज्यामध्ये ‘ऑडी A8L’ गाडीचा समावेश आहे.  या गाडीची किंमत तब्बल १.२३ कोटी इतकी आहे. त्याचप्रमाणे होंडा अकॉर्ड, किया सेल्टोस सारख्या दमदार गाड्यांचेही श्रेयसने कलेक्शन केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

हे देखील वाचा