Friday, October 18, 2024
Home बॉलीवूड मुंबईतील रस्त्यांच्या खड्ड्यावर संतापला मराठी अभिनेता; थेट मुख्यमंत्र्यांनाच म्हणाला, ‘आमच्या हयातीत…’

मुंबईतील रस्त्यांच्या खड्ड्यावर संतापला मराठी अभिनेता; थेट मुख्यमंत्र्यांनाच म्हणाला, ‘आमच्या हयातीत…’

मुंबईतील रस्त्यांची परिस्थिती कशी आहे, याचा प्रत्यय आपल्याला वेळोवेळी येत असतो. कधी व्हिडिओंवरून, तर कधी चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमधून. या रस्त्यांमुळे अनेकदा सामान्य नागरिकांच्या जीवावरही बेतल्याचे आपण पाहिले आहे. या गोष्टींवर नेटकऱ्यांसोबतच कलाकारही आगपाखड करताना दिसतात. आताही असेच काहीसे झाले आहे. मुंबईतील रस्त्यांवरून मराठी अभिनेता सुमीत राघवन याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती केली आहे.

काय आहे प्रकरण?
रस्ते खड्डेमुक्त व्हावे यासाठी एका नेटकऱ्याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून लिहिले होते की, “संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील रस्ते गुळगुळीत करण्याचा आणि वर्षभर एकही खड्डा न पडून देण्याचा एककलमी कार्यक्रम हाती घ्यावा. या सरकारकडून जनतेला अपेक्षा आहे. दिलासा द्या.” हे ट्वीट करताना नेटकऱ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना टॅग केले होते.

सुमीत राघवनची विनंती
हेच ट्वीट रिट्विट करत अभिनेता सुमीत राघवन (Sumeet Raghvan) याने मुख्यमंत्र्यांच्या अकाऊंटला टॅग करत ट्वीट केले की, “अनुमोदन. आमच्या हयातीत एकदा तरी संपूर्ण महाराष्ट्राचे रस्ते उत्कृष्ट प्रतीचे करण्याचे कष्ट या सरकारने घ्यावेत आणि तमाम महाराष्ट्राच्या जनतेचे स्वप्न पूर्ण करावे अशी कळवळून विनंती करतो.” सुमीतच्या या ट्वीटवर शेकडो लाईक्स आणि चाहत्यांच्या कमेंट्स आल्या आहेत.

एकाने अभिनेत्याच्या ट्वीटवर कमेंट करत म्हटले की, “एकदम बरोबर बोललात सर.” तसेच, दुसऱ्या एकाने म्हटले की, “स्वप्नातही शक्य नाही. सामान्य माणसाचा कोणीही वाली नाही.”

सुमीत राघवनचे सिनेमे
अभिनेता सुमीत राघवन याने सन २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यू मी और हम’ या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केले होते. तसेच, त्याने सन २०१५मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘संदूक’ सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. यानंतर त्याने ‘बकेट लिस्ट’, ‘हॉलिडे’ अशा सिनेमातही काम केले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
रणवीरचे न्यूड फोटोशूट काढणारा फोटोग्राफर आहे तरी कोण? ३ तास दीपिकाच्या पतीला ठेवलं होतं उघडं
दिशा आणि टायगरचे नाते तुटले? अभिनेत्याच्या जवळच्या मित्रानेच सांगितले ब्रेकअपबद्दल खरं काय ते
विषयच खोल! ‘हा’ भोजपुरी स्टार वडिलांच्या परवानगीशिवाय घेत नाही अभिनेत्रीची किस, निर्मात्यांना थेट सांगतो…

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा