Friday, May 24, 2024

विषयच खोल! ‘हा’ भोजपुरी स्टार वडिलांच्या परवानगीशिवाय घेत नाही अभिनेत्रीची किस, निर्मात्यांना थेट सांगतो…

मूल जसजसं मोठं होत जातं, तसतसं ते त्याचे निर्णय घेतं. मात्र, काही जण असे असतात, जे विशी ओलांडल्यानंतरही आपले निर्णय हे कुटुंबातील व्यक्तींना विचारून घेतात. असाच एक भोजपुरी अभिनेता आहे, जो सिनेमात किसींग सीन देण्यापूर्वी त्याच्या वडिलांची परवानगी घेतो. तो अभिनेता इतर कुणी नसून प्रसिद्ध अभिनेता आणि गायक अरविंद अकेला कल्लू आहे. त्याच्या चाहत्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्याच्या प्रसिद्धीचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, त्याचे नवीन गाणे प्रदर्शित होताच, सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागते. अरविंद हा मंगळवारी (दि. २६ जुलै) २५वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर जाणून घेऊया त्याच्याबद्दल काही खास गोष्टी…

पदार्पणातच बनला होता सुपरस्टार
अरविंद अकेला कल्लू (Arvind Akela Kallu) याचा जन्म २६ जुलै, १९९७ रोजी बिहारमध्ये झाला होता. वयाच्या आठव्या वर्षापासूनच त्याने गायनाला सुरुवात केली होती. त्याचे ‘चोलिया के हुक राजा जी’ हे पहिले गाणे सन २००४मध्ये प्रदर्शित झाले होते. हे गाणे प्रदर्शित होताच लग्नासोबतच ऑर्केस्ट्रामध्येही तुफान वाजवले जायचे. या गाण्यानंतर अरविंद रातोरात स्टार बनला होता. यानंतर त्याने ‘चली समियाना में आज गोली’, ‘गवनवां कहिया ले जईबा ना’, ‘मुर्गा बेचैन बाटे’, ‘सायकिल में सायकिल लडावेली’, ‘सकेत होता राजा जी’, ‘मिस कॉल मार के’, ‘लभ के टॉनिक’ या गाण्यांमधून भोजपुरी संगीत क्षेत्रात आपला डंका वाजवला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dr. Anara Gupta (@anaraguptaactress)

अभिनयावर फिदा आहेत चाहते
अरविंद हा सर्वोत्तम गायकासोबतच दमदार अभिनेताही आहे. त्याने सन २०१६मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिलदार सजना’ या सिनेमातून अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवले होते. या सिनेमातील त्याच्या अभिनयाने त्याने चाहत्यांची मने जिंकली होती. यानंतर त्याने अनेक भोजपुरी सिनेमात काम केले. तो पवन सिंग याला त्याचा गुरू मानतो.

वडिलांकडून घ्यावी लागते परवानगी
अरविंद याच्याबाबत महत्त्वाची बाब अशी की, त्याला सिनेमात किसींग सीन देण्यासाठी वडिलांकडून परवानगी घ्यावी लागते. एका मुलाखतीत त्याने सांगितले होते की, त्याला किंवा त्याच्या वडिलांना कोणतीही अडचण नाही. मात्र, मी त्यांना आदर्श मानतो. त्यांनीच मला गायन आणि अभिनयासाठी लहानपणापासून पाठिंबा दिला आहे. तो निर्मात्यांना स्पष्ट सांगतो की, जर त्याच्या वडिलांनी सांगितलं, तर तो सर्वकाही करेल.

नावामागची कहाणी
अरविंद अकेला नाव ऐकून विचित्र वाटत असेल की, त्याला असे नाव का पडले? मात्र, यामागे एक विचित्र कहाणी आहे. लहाणपणी अरविंद खूपच एकटा राहायचा. त्यामुळे लोकांनी त्याच्या नावापुढे अकेला असे जोडले. दुसरीकडे, कल्लू हे त्याच्या लहानपणीचे नाव आहे. त्यामुळे तो त्याचे संपूर्ण नाव अरविंद अकेला कल्लू असे लिहितो.

अरविंद याचे वडील चुनमून चौबे हेदेखील लोकगायक राहिले आहेत. ते गावांमध्ये लहान-मोठे कार्यक्रम करायचे. त्यांच्यासोबतच अरविंदही जायचा. त्यामुळे त्याचा या क्षेत्रातील रस वाढत गेला. यादरम्यान त्याने पहिल्यांदा पवन सिंग याचे ‘झुरू झुरू निमिया गछिया’ हे भक्ती गीत गायले होते. त्यामुळे त्याला गावातील लोकांकडून चांगली पसंती मिळाली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
कारगिल युद्धावर आधारित ‘हे’ ५ सिनेमे पाहिलेत का? पाहून तुमचीही छाती गर्वाने फुगेल
श्रेयस तळपदेला लागली लॉटरी! कंगनाच्या ‘इमर्जन्सी’मध्ये बनला माजी पंतप्रधान, फर्स्ट लूक वेधतोय लक्ष
प्रसिद्ध अभिनेत्याचं मोडलं हाड, हॉस्पिटलमधून शेअर केला वाईट अवस्थेतील फोटो

हे देखील वाचा