तेजस्विनी पंडितचे साडीमध्ये खास अंदाजात फोटोशूट! स्वप्नील जोशीच्या कमेंटने वेधले चाहत्यांचे लक्ष

Marathi Actor Swapnil Joshi Commented Tejaswini Pandit Saree Photo


मराठी चित्रपटसृष्टीत जवळपास सर्वच अभिनेत्री सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. आपल्या हटके अंदाजातील फोटो, व्हिडिओ ते चाहत्यांसाठी शेअर करत असतात. यामध्ये ‘गुलाबाची कळी’ म्हणजेच मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितचाही समावेश आहे. तेजस्विनीही आपले नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिने खास अंदाजातील फोटो शेअर केले असून ते जोरदार व्हायरल होत आहेत. तिचा हा फोटो पाहून चाहते प्रतिक्रिया देण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत आणि त्यांनी धडाधड कमेंट करायला सुरुवात केली. कमेंट करणाऱ्यांमध्ये अभिनेता स्वप्निल जोशीचाही समावेश आहे. त्याच्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करत कॅप्शन लिहिले की, “नारी का saree swag !!!” तिच्या या फोटोवर स्वप्निल जोशीने ‘कडक’, तर सिद्धार्थ जाधवनेही ‘सुपर किलर’ अशी कमेंट केली आहे.

यापूर्वीही तेजस्विनीने फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये तिचं रूप अगदी खुलून दिसत होतं. या फोटोमध्ये तिने नथ घातली होती. सोबतच तिने या फोटोला ‘नथीचा नखरा’ असं कॅप्शनही दिलं होतंं.

तेजस्विनी पंडितने ‘तू ही रे’, ‘देवा’, ‘समांतर’, ‘ये रे ये रे पैसा’, ‘आय ऍम सिंधुताई सपकाळ’, ‘अगं बाई अरेच्छा’, ‘अंगारकी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.