सध्या मराठी सिनेविश्वात आणि बॉक्स ऑफिसवर सध्या एका आणि फक्त एकाच सिनेमाची चर्चा आहे…बरोबर ‘वेड’, रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख अभिनित वेड या सिनेमाने कमाईचा डोंगरच रचायला सुरुवात केली आहे. मराठीमधील सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा म्हणून ‘वेड’चे नाव घेतले जात आहे. ५० कोटीच्या आकड्याकडे जाताना या सिनेमाने नवनवीन रेकॉर्ड केले. अक्षरशः बॉलिवूडच्या आणि साऊथच्या मोठ्या चित्रपटांना पछाडत या सिनेमाने ही कामगिरी केली आहे. या सिनेमाचे यश पाहून बॉलिवूडमधील कलाकारांसोबतच मराठी इंडस्ट्रीमधील कलाकार देखील रितेश आणि जिनिलियाला शुभेच्छा देताना दिसत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कलाकारांनी या दोघांचे अभिनंदन केले आहे.
“वेड” आज BO वर ५० कोटीचा गल्ला पार करेल !
केवळ क. मा. ल. कामगिरी !
मराठी पाउल पाढते पुढे! मनापासून अभिनंदन @Riteishd भाऊ, @geneliad वैनी आणि पूर्ण टीम!— Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी (@swwapniljoshi) January 18, 2023
आता मराठी इंडस्ट्रीमधील शाहरुख खान अशी ओळख असलेल्या स्वप्नील जोशीने देखील ट्विटरच्या माध्यमातून रितेश आणि जिनिलियाला शुभेच्छा दिल्या आहेत. स्वप्नीलने मराठीमध्ये ट्विट करत लिहिले,
“वेड” आज BO वर ५० कोटीचा गल्ला पार करेल !
केवळ क. मा. ल. कामगिरी !
मराठी पाउल पाढते पुढे! मनापासून अभिनंदन
रितेश भाऊ, जिनिलीया वैनी आणि पूर्ण टीम!”
भाऊ …. मनापासून आभार – big hug @swwapniljoshi लवकर भेटू !!! https://t.co/NPozVZXQYX
— Riteish Deshmukh (@Riteishd) January 18, 2023
तुमच्या शुभेच्छांसाठी खूप खूप धान्यवाद.. @swwapniljoshi – ????????????????
— Genelia Deshmukh (@geneliad) January 18, 2023
स्वप्नील जोशीच्या या ट्विटवर मराठीमध्ये उत्तर देताना रितेशने लिहिले, ” “भाऊ…. मनापासून आभार – big hug लवकर भेटू !!!” तर अभिनेत्री जिनिलीया देशमुखने लिहिले आहे, “तुमच्या शुभेच्छांसाठी खूप खूप धान्यवाद..”. सध्या हे ट्विट सर्वत्र व्हायरल होत आहे. रितेशचा वेड आणि स्वप्नील जोशीचा ‘वाळवी’ हे दोन सिनेमे सध्या चांगलेच गाजत आहे.
@geneliad वहिनी not वैनी रे, म्हणून मराठीत बोला ,आणि मराठी SRK cha बालिश ढोंग करू नका,
— Diptesh (@Diptesh1258) January 18, 2023
अरे कसली भाषा तुमची..
वहिनी
असं असतं ते..
म्हणे मी पुण्याचा..— Proud Indian ???????? (@enjoynams) January 19, 2023
एकीकडे स्वप्नीलचे ट्विट व्हायरल होत असताना दुसरीकडे मात्र त्याला या ट्विटवरून अनेकांनी ट्रोल केले आहे. स्वप्नीलने केलेल्या ट्विट मध्ये काही चुका असल्यामुळे तो आता ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. स्वप्नीलने ट्विटमध्ये तीन शब्द चुकीचे लिहिले आहे. या ट्विटमध्ये त्याने ‘पाउल’, ‘पाढते’ आणि ‘वैनी’ हे तीन शब्द चुकवले आहे. त्यावरून आता तो ट्रोल होत आहे. एकाने लिहिले, “वैनी नाही रे वहिनी.” तर एकाने “अरे कसली भाषा तुमची.. वहिनी असं असतं ते.. म्हणे मी पुण्याचा..”, दुसऱ्याने लिहिले, “वहिनी not वैनी रे, म्हणून मराठीत बोला आणि मराठी SRK cha बालिश ढोंग करू नका.” अजून एकाने लिहिले, “मराठी व्यवस्थित लिहा” असे ट्विट केले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चिन्मय मांडलेकरने हिंदी चित्रपटांना नकार देण्यामागचं सांगितलं कारण; म्हणाला, ‘निर्माते त्यांच्या चित्रपटांमध्ये…’
प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता ज्युलियन सँड्स अमेरिकेमध्ये हायकिंग करताना बेपत्ता