Tuesday, October 14, 2025
Home मराठी धक्कादायक ! काम मिळत नसल्याने मराठी अभिनेता तुषार घाडीगावकरने केली आत्महत्या

धक्कादायक ! काम मिळत नसल्याने मराठी अभिनेता तुषार घाडीगावकरने केली आत्महत्या

मराठी मनोरंजनसृष्टीतून एक अत्यंत दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मराठी अभिनेते, दिग्दर्शक तुषार घाडीगावकर याचे निधन झाले आहे, हाती आलेल्या माहितीनुसार त्याने आत्महत्या केली आहे. त्याच्या निधनाने सर्वांना धक्का बसला आहे आणि दुःख झाले आहे.

त्याच्या निधनाच्या बातमीनंतर अभिनेता अंकुर वाढवे याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून दुःख व्यक्त केले आहे. कोणत्याही गोष्टीचा शेवटआत्महत्या असू शकत नाही असे त्याने म्हटले आहे. अंकुरने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून कॅप्शन दिले आहे की, “मित्रा का? कशासाठी? काम येतात जातात. आपण मार्ग काढले पाहिजे पण त्यावर आत्महत्या हा पर्याय नाही. मान्य आहे सध्याची परिस्थिती विचित्र आहे पण हा निर्णय नाही होऊ शकत. तुषार घाडीगावकर तू हरलास म्हणजे आम्ही सगळे हारलो.” अशाप्रकारे अंकुरने दुःख व्यक्त केले आहे.

अंकुरच्या या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांनी कमेंट करत तुषारला श्रद्धांजली अर्पण केली आहे तसेच त्याच्या हा निर्णय चुकला असे देखील अनेकजण म्हणत आहेत. तुषारने मराठी मनोरंजन सृष्टीत अनेक काम केली आहे, त्याने मन कस्तुरी रे, लवंगी मिरची, भाऊबळी, उनाड, हे मन बावरे, झोंबिवली संगीत बिबट यामध्ये काम केले आहे. तुषारने अनेक मालिकांमधून तसेच नाटकातून त्याच्या करिअरला सुरुवात केली होती. परंतु सध्या त्याला कोणतेही काम मिळत नव्हते आणि घर चालवायला पैसे नसल्याने त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या निधनाने अनेकांना दुःख झाले आहे. अनेक कलाकार सोशल मीडियावर पोस्ट करून हळहळ व्यक्त करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

‘पाकिस्तानात मला कधीच आदर मिळाला नाही’, नागरिकत्वावरील टीकेवर अदनान सामीने केले मत व्यक्त
‘पाकिस्तानात मला कधीच आदर मिळाला नाही’, नागरिकत्वावरील टीकेवर अदनान सामीने केले मत व्यक्त

हे देखील वाचा