नवोदित कलाकारांना आपली प्रतिभा दाखविण्यासाठी ‘रा’ फिल्म्स आणि निर्माते संदीप मधुकर बधे यांच्यातर्फे वर्तक आश्रम मंगल कार्यालय, प्रभात रोड येथे नुकतेच नवीन चित्रपटासाठी ऑडीशन तसेच कलाकार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच विजेत्या कलाकारांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

तसेच यातून कलाकारांना ‘रा’ फिल्मच्या आगामी काळात येणाऱ्या चित्रपटासाठी देखील निवड करण्यात येईल अशी ग्वाही ‘रा’ फिल्म्सच्या निर्मात्या राणी टोणगे आणि दिग्दर्शक प्रदीपजी टोणगे यांनी दिली. या कार्यक्रमाला नगर, नाशिक, औरंगाबाद, सातारा, सांगली, मुंबई, पुणे अशा विविध शहरांमधून साधारण २५०-३०० कलाकारांनी सहभाग घेतला होता. यावेळी महाराष्ट्रातील लाडक्या मिसेस मुख्यमंत्री फेम अभिनेत्री अमृता धोंगडे या देखील उपस्थित होत्या. (marathi actors get awards who win audition)

या सोहळ्याचे संपूर्ण आयोजन मा. संदीप मधुकर बधे व ‘रा’ फिल्म्स या निर्मिती संस्थेने केले होते. राणी टोणगे, दिनेश किरवे, गणेश शिंदे, सुजित जाधव यांनी ज्युरी म्हणून काम पाहिले. याप्रसंगी संदीप बधे, कोंढवा मधील संदीप नाना मारुती बधे, सिनेअभिनेत्री अमृता धोंगडे, बळीशेठ निंबाळकर, शिवभक्त सचिन गवळी, आदित्य राजे मराठे, अशोकभाऊ एकतपुरे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवर तसेच उपस्थित कलाकारांनी ‘रा’ फिल्म्सच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले.
हेही वाचा :
अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने २०२१ वर्षात त्याला मिळालेल्या यशासाठी मानले प्रेक्षकांचे आभार, म्हणाला…
बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते विजय गिलानी यांचे दुःखद निधन
पंकज कपूर यांनी १६ वर्षांच्या नीलिमा यांच्याशी केले होते लग्न, मात्र केवळ ९ वर्षातच झाला घटस्फोट










