Saturday, March 2, 2024

पंकज कपूर यांनी१६ वर्षांच्या नीलिमा यांच्याशी केले होते लग्न, मात्र केवळ ९ वर्षातच झाला घटस्फोट

तुम्हाला माहिती आहे का की, नीलिमा अजीम यांनी पंकज कपूरसोबत लग्न केले तेव्हा त्या १६ वर्षांच्या होत्या. तर पंकज कपूर २१ वर्षांचे होते. दोघांनी १९७५ मध्ये लग्न केले. नीलिमा आणि पंकज यांनी लग्नाच्या ९ वर्षानंतर १९८४ मध्ये एकमेकांना घटस्फोट दिला. नीलिमा आणि पंकज एकमेकांपासून वेगळे झाले, तेव्हा शाहिद कपूर केवळ साडेतीन वर्षांचा होता. नीलिमा यांनी एकट्याने शाहिद कपूरला मोठे केले. नीलिमा यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, पंकज त्यांना चित्रपट आणि टीव्हीमध्ये नशीब आजमावण्यासाठी मुंबईत सोडण्यापूर्वीच त्यांना त्यांच्या गरोदरपणाबद्दल कळले होते.

नीलिमा यांनी शाहिद कपूरला (Shahid Kapoor) सिंगल मदरप्रमाणे वाढवले. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, पंकज यांच्यासोबत वेगळे होण्याचा निर्णय तिचा नव्हता. त्या म्हणाल्या की, पंकज कपूर पुढे गेले होते आणि मला पोट भरणे कठीण झाले होते. वयाच्या १५ व्या वर्षी पंकज कपूर यांच्यासोबत मैत्री झाल्याचे त्यांनी सांगितले होते. पंकज यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर नीलिमा यांनी १९९० मध्ये राजेश खट्टरसोबत लग्न केले. दोघांना एक मुलगा ईशान खट्टर आहे.

नीलिमा आणि राजेश यांचा २००१ मध्ये घटस्फोट झाला. यानंतर नीलिमा यांनी २००४ मध्ये रजा अली खानसोबत लग्न केले आणि २००९ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. नीलिमा यांनी त्यांच लग्नाच्या तुटण्याबाबत त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, “जेव्हा माझे पहिले लग्न तुटले तेव्हा मला खूप वाईट वाटले होते. तर दुसरे लग्न टाळता आले असते, जर त्यावर त्यांचे थोडे नियंत्रण असते.” त्या म्हणाल्या होत्या की, “सर्व काही अचानक संपुष्टात आले आणि मी पहिल्यांदाच दुःख, वेदना, नाकारण्याची नाराजी आणि भीती अनुभवली. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी दीड वर्ष लागले.”

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून आणि आपल्या दमदार अभिनयासाठी शाहिद कपूर ओळखला जातो. शाहिद कपूर आता ‘जर्सी’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत मृणाल ठाकूर दिसणार आहे. नुकतेच ‘बिग बॉस १५’ मध्ये विकेंड का वारच्या एपिसोडमध्ये शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) पाहुण्यांच्या भूमिकेत दिसले. दोघेही त्यांच्या आगामी ‘जर्सी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते. यादरम्यान शाहिद आणि मृणालने सलमान खानसोबत खूप धमाल केली.

शाहिद आणि मृणालच्या या चित्रपटातील गाणी देखील प्रचंड हिट होत आहेत. हा चित्रपट ३१ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र कोव्हिडमुळे या चित्रपटाची प्रदर्शन डेट बदलण्यात आली आहे. मात्र टीमने अद्याप ती जाहीर केली नाही. आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा