Saturday, July 6, 2024

शिवचिंतनात रमलेला शिवआराधक; मराठी कलाविश्वातून बाबासाहेब पुरंदरेंना श्रद्धांजली अर्पण

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची वृद्धापाळाने रविवारी (१४ नोव्हेंबर) रोजी प्राणज्योत मालवली आहे. ते पुण्यामधील दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयात दाखल झाले होते. उपचार दरम्यान वयाच्या १०० व्या वर्षी या महान कलाकारांचे निधन झाले आहे. एवढा महान कलावंत गेल्याने मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

अभिनेता केदार शिंदे याने ट्विटरवर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबत एक फोटो शेअर करून‌‌ त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्याने लिहिले आहे की, “या भेटीच्या निमित्ताने इतिहासाच्या जवळ जाता आलं. हेचं भाग्य समजतो विनम्र अभिवादन आणि मुजरा शिव शाहीर बाबासाहेब.” (Marathi actors give homage to Babasaheb purandare on social media)

यासोबतच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने ट्वीट केले आहे की, “तुमच्या वाणीतून ऐकलेले शिवबांचे चरित्र कधीच विसरता येणार नाही, मुजरा शिव शाहीर.”

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (ज्युनिअर) हिने देखील सोशल मीडियावर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तिने लिहिले आहे की, “शिव शाहीर, शिवव्याख्याते आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.”

सिद्धार्थ जाधवने ट्वीट केले आहे की, “शिव चिंतनात रमलेला शिवाराधक पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे भावपूर्ण श्रद्धांजली.”

यासोबतच अभिनेता स्वप्नील जोशी याने ट्वीट केले आहे की, “शिव शाहीर आ. बाबासाहेब पुरंदरे भावपूर्ण श्रद्धांजली.”

अशा प्रकारे मराठी चित्रपटसृष्टीतून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. त्यांनी त्यांच्या कामाने त्यांचे एक अढळ स्थान निर्माण करून ठेवले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सलमान अन् राणीने ‘तेरी चुनरिया’वर केला जबरदस्त डान्स, चाहत्यांच्या आठवणी झाल्या ताज्या

-कंगना रणौतला पुरस्कार, पण तुमच्या नावाचा विचार का नाही झाला? पाहा या प्रश्नावर काय म्हणाला सोनू सूद

-मलायका अन् लहान मुलांची जबरदस्त बॉंडिंग, चिमुकल्याने गाल ओढताच अभिनेत्रीने मारली मिठी

हे देखील वाचा