Friday, December 8, 2023

मिलिंद गवळी यांच्या शिवकालीन किल्ल्यांविषयीच्या पोस्टनं वेधलं लक्ष, म्हणाले, ‘मुलांना इतिहास…’

मिलिंद गवळी हे मराठी चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय अभिनेते आहेत. ते त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या इतिहास प्रेमासाठी देखील ओळखले जातात. शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून त्यांनी नुकताच लोहगडावर ट्रेकिंगसाठी गेले होते. लोहगडावर ट्रेक करताना त्यांच्या मनात विविध विचार येऊ लागले. त्यांचे हे विचार त्यांनी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे त्यांच्या चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.

मिलिंद गवळी (milind gawali) यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे, “लोहगड परवा हा गड चढायचा योग आला. खूप छान वाटलं, आपल्याला गड चढता येतो याचं एक वेगळं समाधान असतं, उंच डोंगर चढणं काय साधी गोष्ट नसते, आपण जेव्हा गड चढतो तेव्हा आपल्याला धाप लागत असते, काही लोक थांबत थांबत चढता , तर काहींचा स्टॅमिना चांगला असतो , ते एका दमात तो गड चढायचा प्रयत्न करतात, दररोज व्यायाम म्हणून गड चढणारे लोक पण आहेत, एकदा का आपण गडावर पोचलो की एक वेगळं समाधान मिळतं, वेगळीच शांती मिळते,माझ्याबरोबर “Zen“आमचा कुत्रा होता , तो एका दमात वरती धावत सुटला, त्याचा स्टॅमिना बघून मला त्याचा हेवा वाटला.

असं वाटलं की आपल्या मध्ये सुद्धा अशी ताकद असायला हवी, वरती पोहोचल्यावर डोक्यामध्ये असंख्य विचार येत होते, ते विचार असे होते की जर शिवाजी महाराजांचा इतिहास मुलांना शिकवायचा असेल तर तो वर्गामध्ये बसून न शिकवतात जर आपण गडावरच मुलांना घेऊन गेलो आणि तिथे त्यांना इतिहास शिकवला तर तो त्यांच्या कायमस्वरूपी मनामध्ये घर करून बसेल आणि महाराजांचे विचार त्यांच्यापर्यंत खूप छान पद्धतीने पोचतील, जसं रवींद्रनाथ टागोरांनी शांतिनिकेतन ची स्थापना केली , एक वेगळी शिक्षण पद्धती तयार केली तशीच आपण का नाही तयार करू शकत, छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले आहेत.

पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, राजमाची, विसापूर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, चंद्रगड, सुरगड, घोसाळगड, कडासरी, रायगड, तोरणा, राजगड, सिंहगड आणि विशाळगड. या सगळ्या गडांवर/ किल्ल्यांवर जर मुलांसाठी शाळा सुरू केल्या,आणि तिथे त्यांना इतिहास शिकवला,
तर मला नाही वाटत की या जन्मात ती मुलं कधी आपला महान इतिहास विसरतील.
आत्ताच्या आळशी इंटरनेट शिक्षण पद्धतीतून त्यांना बाहेर काढायचे असेल तर त्यांना गड चढायला लावणे आणि गडावर इतिहास शिकवणे हा एक छान पर्याय मला सुचतो आहे. ”

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

 मिलिंद गवळी यांच्या या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक चाहत्यांनी त्यांना लोहगडावर ट्रेक करण्याचा आनंद घेतल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. तर काही चाहत्यांनी त्यांना शिवाजी महाराजांच्या इतिहासावरील त्यांच्या विचारांबद्दल कौतुक केले आहे. मिलिंद गवळी यांच्या या पोस्टमुळे अनेकांना शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे. (Marathi actors milind gawali shared post on chhatrapati shivaji maharaj forts and history of maharashtra)

आधिक वाचा-
किरण मानेंची मराठा आरक्षणाबद्दल खास पोस्ट; म्हणाले, ‘सडेतोड बोलणारा आणि वागणारा हा माणूस…’
‘आई कुठे काय करते’च्या अरुंधतीची वेणी कुठे गेली? अभिनेत्रीचा नवा लूक पाहून चाहते म्हणाले…

हे देखील वाचा