Friday, December 8, 2023

‘एखादा पोलीस कितीही भ्रष्टाचारी असला तरी…’, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळी यांची पोस्ट व्हायरल

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये सध्या एक वेगळाच ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. या मालिकेत आरोही नावाच्या नवीन पात्राची एंट्री झाली आहे. तिच्यावर काही श्रीमंत घरातील मुलांनी बलात्कार केल्याचे मालिकेत दाखवले जात आहे. या सर्व घटनेमध्ये देशमुख कुटुंबीय आरोहीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहताना दिसत आहे.

यानिमित्ताने अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले की, “अनिरुद्ध देशमुख ज्यावेळेला उभे राहतो. त्यावेळेला अनेकांच्या मनामध्ये आणि माझ्या मनामध्ये पण असा विचार येतो की, आता या माणसाचं काय करायचं, माणूस इतका चांगला पण वागू शकतो ?,असा प्रश्न आल्या शिवाय राहत नाही, अनिरुद्धच नाव इतकं बदनाम झालं आहे, की तो जे करेल ते चुकीचं आहे असं मनामध्ये भावना येणं साहजिक आहे, काही काही परिस्थितीमध्ये हा माणूस अगदी हिरो सारखाच वागतो, धिर देतो, आधार देतो. मी पण ज्या वेळेला स्क्रिप्ट वाचतो त्यावेळेला नकळत माझ्या चेहऱ्यावर हसू येतं आणि मन भरून येतं, डोळे सुद्धा भरून येतात, मनातल्या मनात नमिता वर्तक हिला धन्यवाद सुद्धा म्हणत असतो.

पण खरंच आहे किती वाईट माणूस असला तरी काही काही बाबतीत माणसाने ठांब भूमिका घ्यायलाच हवी, योग्य माणसांना साथ द्यायलाच हवी. मुंबई पोलिसांच्या बाबतीत एक खूप चांगली गोष्ट ऐकली आहे, ती म्हणजे खात्यामध्ये corruption आहे, पण एखादा पोलिस वाला कितीही corrupt असला तरी असं म्हटलं जातं की Rape ,Murder, Drink & Drive आणि drugs या cases मध्ये कुठलाही पोलिसवाला कधीही तो पैसे खात नाही , गुन्हेगाराला कधीही साथ देत नाही.

कदाचित अनिरुद्ध देशमुखचं असंच काहीतरी असावं. या सिनमध्ये ज्यावेळेला तू आरोहीची बाजू घेऊन बोलतो, जे प्रत्येकाने करायला हवं तेच करतो, त्यावेळेला खरंच अनिरुद्ध साकारायला मला मजा येते. मला रोज अनिरुद्ध ची एक नव्याने ओळख होत जाते, आणि पुन्हा एकदा त्या अनिरुद्ध देशमुखच्या प्रेमात पडावसं वाटतं. हा अनिरुद्ध देशमुख नमिता वर्तक आणि राजनजी शाही यांच्या विचाराने घडत जात असतो, खरं तर माझ्या हातात काहीच नाहीये, लोकं मला त्या भूमिकेसाठी ओळखतात, पण अनिरुद्ध देशमुख हे तेच घडवत असतात, प्रेक्षकांसारखा मी सुद्धा आतुरतेने वाट बघत असतो की आता अनिरुद्धची काय भूमिका आहे.” असे त्याने लिहिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

मालिकेच्या या नवीन ट्वीस्टमुळे प्रेक्षकांना खूप आश्चर्य वाटले आहे. अनेक प्रेक्षकांनी या मालिकेचे कौतुक केले आहे. त्यांनी सांगितले की, ‘आई कुठे काय करते’ ही मालिका नेहमीच सामाजिक समस्यांवर भाष्य करते. या मालिकेमुळे समाजात चांगले बदल घडतील. या मालिकेत आरोहीच्या भूमिकेत अभिनेत्री स्वरांगी मराठे दिसत आहे. स्वरांगीने या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली आहे. या मालिकेत आरोहीला मदत करण्यासाठी देशमुख कुटुंब खंबीरपणे उभे आहे. या कुटुंबातील सदस्य आरोहीला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. या मालिकेच्या या नवीन ट्वीस्टमुळे प्रेक्षकांना खूप उत्सुकता लागली आहे.

आधिक वाचा-
तुझं सौंदर्य जणू खुललेला गुलमोहर.. शिवानीचे अतिसुंदर फोटो
जगभरातील सर्वाधिक कमाई करणारा ‘हा’ आहे हिंदी चित्रपट, केली तब्बल ‘इतक्या’ कोटींची कमाई

हे देखील वाचा